राष्ट्रीय पल्सपोलियो लसीकरण कार्यक्रमाचे मा.आमदार कांशीराम पावरा यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न




रोहिणी - आज दि.31 जानेवारी रोजी संपुर्ण भारतात राष्ट्रीय पल्सपोलियो लसीकरण मोहिम राबविली जात आहे.त्याच मोहिमेंतर्गत शिरपूर तालुक्यातील पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ प्राथमिक आरोग्य केंद्र रोहिणी अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र सुळे येथे शिरपूर मतदार संघाचे आमदार श्री.काशीराम पावरा यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आला.प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.प्रसन्नकुमार कुलकर्णी श्री.सुखराम पावरा सरपंच सुळे व डाॅ.राष्ट्रपाल अहिरे उपस्थित होते.
आमदार साहेबांच्या हस्ते शुन्य ते पाच वर्षाच्या आतिल बालकास पोलियोची लस पाजुन प्रत्यक्ष लसीकरणाला सुरवात झाली.
   प्रा.आ.केंद्र रोहिणिचे कामकाज सुधारले असुन डाॅ.राष्ट्रपाल अहिरे यांच्या मार्गदर्शनानुसार चांगली आरोग्यसेवा कोरोनाकाळात पुरविली गेली,त्याप्रमाणेच या पुढे इतर आरोग्यसेवाही सुरळित व समाधान कारक मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली.तसेच एकही बालक पोलिओ वा इतर कोणत्याच लसीकरण पासुन वंचित रहाणार नाही या साठी आरोग्य यंत्रणेने दक्ष रहावे अशा सुचना दिल्यात.
कोरोना काळातील ही पहिलीच व्यापक राष्ट्रीय लसीकरण मोहिम होती त्याअनुषंगाने लसीकरण सत्र ठिकाणी सँनिटायझर व सोशल डिस्टेनसिंग ठेवुन लसीकरण करण्याच्या सुचना तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी दिल्यात.
   आज अखेर रोहिणि प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत राबविलेल्या आजच्या लसीकरण मोहिमेंतर्गत एकुण चोपन्न बुथच्या माध्यमातुन पाच हजार चारशे पंचवीस मुलांना डोस पाजले.अपेक्षित लाभार्थी पैकी नव्वद टक्के लसीकरण झाले.उर्वरित लाभार्थी यांना मंगळवार पासुन तिन दिवस घरोघरी जावुन पोलिओ डोस दिला जाणार आहे.
आजच्या लसीकरण कार्यक्रम चे नियोजन डाॅ.राष्ट्रपाल अहिरे वैद्यकिय अधिकारी प्रा.आ.केंद्र रोहिणि यांच्या मार्गदर्शनानुसार डाॅ.प्रितम माळी,डाॅ.ज्ञानेश्वर सोलंकी,डाॅ.अमोल पवार,डाॅ.विजेद्रसिह बर्ने व श्रीमती एस यु शिंदे,श्री.डि.एल सांगळे,श्री.अनिल मराठे व श्रीमती तारका सिस्टर तसेच सर्व आरोग्यसेवक,आरोग्यसेविका आणि आशास्वयंमसेवक व अंगणवाडी सेविका व परिचर सह सर्व कर्मचारीवर्ग रोहिणी यांनी सक्रिय सहभाग घेवुन मोहिम यशस्वी केली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने