*दोंडाईचा वि.प्र.-* हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलीत हस्ती पब्लिक स्कूल अँड ज्यु. कॉलेज दोंडाईचा - दाउळ शिवार कँपस् येथे दि. १२जानेवारी २०२१ मंगळवार रोजी स. १०:०० वा. शालेय समिती चेअरमन कैलास जैन यांचे मार्गदर्शनाने शिंदखेडा तालुक्यातील १७ वर्ष आतील क्रिकेट खेळाडूंची निवड चाचणी संपन्न होणार आहे. सदरच्या निवड चाचणीचे आयोजन एसव्हीकेएम व सारथी क्रिकेट अकॅडमी धुळे यांचे सहकार्याने करण्यात आले आहे.
या निवड चाचणीद्वारा निवड झालेल्या खेळाडूंचा संघ आगामी शिरपूर येथे टर्फ खेळपट्टया व हिरवेगार मैदानावर संपन्न होणाऱ्या १७ वर्ष आतील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत सहभागी होईल. विशेषत: या स्पर्धेकरिता संपूर्ण संघाचा जाण्याचा व येण्याचा खर्च आणि संघ प्रवेश फी खर्च हस्ती परिवार करणार आहे. तसेच या स्पर्धेचे संपूर्ण आयोजन माननीय अमरीश भाईसाहेब पटेल व भुपेश भाईसाहेब पटेल करणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व आठ संघातील खेळांडूंना गणवेशासह, निवास व भोजन व्यवस्थाही स्पर्धा आयोजकांमार्फत केली जाणार आहे.
यास्तव शिंदखेडा तालुक्यातील १७ वर्ष आतील क्रिकेट पटूंनी वरील तारखेस आपले क्रिकेट साहित्य बॅट - बॉल सह निवड चाचणीकरिता बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निवड चाचणी आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. तरी निवड चाचणीच्या अधिक माहितीसाठी विजय पंजाबी सर- धुळे ९४२२७५६१२४, रणजी पटू देविदास मोरे - ९६२५३१४८६५, विलास पाटिल सर - ९६७३६८३०५९, विशाल पवार सर - ७३८७७११८५३ यांचेशी संपर्क साधावा.
Tags
news
