धुळे जिल्हा ग्रामीण मधील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर



 

शिंदखेडा (प्रतिनिधी) : धुळे जिल्हा ग्रामीण मधील शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या वंदनीय शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्रीमान उध्दव साहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने युवासेना प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री श्रीमान आदित्यसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने उत्तर महाराष्ट्राचे संपर्क नेते खासदार श्रीमान संजय राऊत साहेब व धुळे जिल्हा संपर्क प्रमुख श्री.बबनराव थोरात यांच्या मार्गदर्शनाने धुळे जिल्हा युवाधिकारी व युवासेना सरसचिव ॲड.पंकज गोरे यांच्या शिफारशीने खालील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे : शिंदखेडा विधानसभा मतदार संघ उपजिल्हा युवाधिकारीपदी गणेश शांतीलाल परदेशी, शिरपूर विधानसभा मतदार संघ उपजिल्हा युवाधिकारीपदी रोशन सोनवणे, दोंडाईचा विभाग तालुका युवाधिकारीपदी आकाश कोळी, शिंदखेडा तालुका युवाधिकारीपदी प्रदीप पवार, शिरपूर दक्षिण तालुका युवाधिकारीपदी अनिकेत बोरसे, शिरपूर उत्तर तालुका युवाधिकारीपदी विजय पावरा, शिंदखेडा (शहर)-शहर युवाधिकारीपदी अनिल माळी, दोंडाईचा (शहर) शहर युवाधिकारीपदी सागर पवार, शिरपूर (शहर) शहर युवाधिकारीपदी निखिल मराठे, शिरपूर (शहर) शहर समन्वयकपदी सचिन शिरसाठ, शिंदखेडा उपतालुका युवाधिकारीपदी प्रतिक पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सर्व नवनियुक्त युवासेना पदाधिकाऱ्यांचे शिवसेना धुळे जिल्हा (ग्रामीण) जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, जिल्हा संघटक मंगेश पवार, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, दोंडाईचा कृ.उ.बा.स.संचालक सर्जेराव पाटील, भरतसिंग राजपुत, तालुका प्रमुख गिरीश देसले, अत्तरसिंग पावरा, दिपक चोरमले, उपजिल्हा संघटक भाईदास पाटील, कल्याण बागल, विभा जोगराणा, उपतालुकाप्रमुख संतोष देसले, विधानसभा संघटक छोटू पाटील, तालुका समन्वयक विनायक पवार, शहर प्रमुख सागर देसले, छोटुसिंग राजपुत, दोंडाईचा शहरप्रमुख चेतन राजपुत, दोंडाईचा उपतालुकाप्रमुख शैलेश सोनार, उपशहरप्रमुख दिपक मराठे, विभागप्रमुख शानाभाऊ धनगर, मनोज पवार, दिपकराव जगताप, सुकदेव बागुल यांनी अभिनंदन केले.    

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने