शिरपूर -गेल्या अनेक महिन्यापासून कोरोनासारख्या महामारी मुळे अनेक विभागाची यंत्रणा ठप्प झालेली आहे. शिक्षण क्षेत्रात सुद्धा कोरोना सारख्या महामारी मुळे शिक्षक विद्यार्थी यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गेल्या अनेक महिन्यापासून पेट परीक्षा घेण्यात यावी यासाठी विद्यार्थी विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीच्या माध्यमातून संपर्क साधत होते.नुकतेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएच.डी प्रवेश परीक्षा 2021 साठी अर्ज मागवलेले आहेत. तसेच उत्तर महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने पीएच.डी प्रवेश परीक्षा घ्यावी यासाठी प्रत्यक्ष तसेच भ्रमणध्वनीच्या माध्यमातून सिनेट सदस्य अमोल सोनवणे यांना संपर्क करीत आहेत. म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथील प्रशासनाने सुद्धा विद्यार्थ्यांचा हिताचा विचार करून पीएच.डी प्रवेश परीक्षा लवकरात लवकर घ्याव्यात अशा आशयाचे पत्र दिनांक 4 जानेवारी रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथील पदवीधर विभागातून निवडून आलेले सिनेट सदस्य अमोल सोनवणे यांनी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. पी. पी. पाटील , प्र-कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर पी.पी. माहुलीकर यांना यासंदर्भात निवेदन दिले.
Tags
news
