अंबरनाथ ( शैलेश सणस )
अंबरनाथ -शिवसेना अंबरनाथ शहर प्रमुख श्री अरविंदजी वाळेकर साहेब व नगराध्यक्षा सौ मनिषा ताई वाळेकर यांच्या मार्गदर्शनाने व आपले कर्तव्य बजावणाऱ्या एकविरा आई ग्रुपचे (अध्यक्ष व शिवसैनिक) श्री अजय (दादा) मोहोरीकर यांच्या कडून वॉर्ड क्र 36 आंबेडकर नगर येथे गेल्या 3 ते 4 दिवसा पासून पिण्याचं पाणी येत नव्हते आणि म्हणून सर्व रहिवाशी आणि नागरिकांना यांचा खूप त्रास होत होता. ही समस्या गोरगरिबांचे कैवारी म्हणून नावाजलेले व्यक्ती म्हत्व तसेच आमचे एकविरा आई ग्रुपचे अध्यक्ष व शिवसैनिक अजय दादा मोहोरीकर यांना येऊन नागिरकांनी सांगीतले व अजय दादा यांनी पाणी चे टँकर बोलवलं आणि सर्व नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिले व वॉर्ड क्र 36 मधील सर्व नागरिकांनी दादाचें आभार देखील मानले आहेत.
Tags
news
