पटेल परिवाराच्या योगदानातून शिरपूर तालुक्यात अविरतपणे विकासाची कामे सुरू - आमदार काशीराम पावरा यांचे प्रतिपादन,
शिरपूर : माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नाने शिरपूर तालुक्यात अविरतपणे विकासाची कामे सुरू असून त्यांच्या दूरदृष्टीतून शिरपूर पॅटर्नमार्फत सर्वत्र बंधारे बांधण्याचे व्यापक स्वरूपात कामे होत आहेत. असा नेता होणे शक्य नाही. राज्यात आदर्श कार्य हे आपल्या शिरपूर तालुक्यात होत असून शेतकरी बांधव सुखी होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अनेक क्षेत्रात भाईंचे कार्य न थकता अविरतपणे सुरु आहे. सहकार्य वृत्तीने त्यांचे कार्य असून भेदभाव न करता सामाजिक कार्याला ते न्याय देतात. सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी
दूरदृष्टी ठेवून पुढील ३० ते ४० वर्षांचा विचार करून तालुक्यात विकासकामे सुरु आहेत. राजकीय चढाओढ बाजूला ठेवून, गावात एकोपा ठेवावा व विकासाच्या कामांना सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन आमदार काशिराम पावरा यांनी केले.
तालुक्यातील दहिवद गावाजवळील दोधेश्वर मंदिर नजिक नाल्यावर शुक्रवारी दि. २२ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता शिरपूर पॅटर्नच्या २५६ ते २६० या पाच बंधाऱ्यांचे भूमिपूजन शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल म्हणाले, तपनभाई पटेल यांच्या भगिनी अहमदाबाद येथील सौ. मेहादीदी शरविलभाई पटेल यांच्या प्रयत्नाने शिरपूर तालुक्यात "तपनभाई पटेल किसान समृद्धी योजना" सुरु करण्यात आली आहे. गट निहाय शेतकरी बांधव यांच्यासाठी कार्याला प्रारंभ झाला. टाटा कन्सल्टन्सी व झायडस कॅडीला या कंपनीच्या सहकार्याने तालुक्यातील शेतकरी बांधव यांच्या साठी फायदेशीर योजना सुरु केेली आहे. महिला भगिनी यांनीही शेती उत्पन्नासाठी व कुटुंबाच्या प्रगतीसाठी पुुढे यावे कारण महिला भगिनी या काटकसरीने संसार चालवतात. तालुक्याच्या विकासासाठी व सर्वसामान्यांच्या भल्यासाठी आपण किसान समृद्धी योजना सुरू केली असून शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन भूपेशभाई पटेल यांनी केले.
कार्यक्रमाला आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, जिल्हा परिषद सदस्य सुक्राम पावरा, पंचायत समिती सदस्य छायाताई प्रल्हाद पावरा, दहिवद नवनिर्वाचित पॅनल प्रमुख माजी सरपंच लक्ष्मीकांत चव्हाण (शेखर सर), प्रल्हाद पाटील, धोंडू चौधरी, माजी सरपंच बालू चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते भैय्या चव्हाण, अहिल्यापूर सरपंच संग्रामसिंग राजपूत, गरताड माजी सरपंच अशोक सोनवणे, ताजपुरी सरपंच हेमंत सनेर, अजंदे सरपंच राजेंद्र पाटील, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, शिरपूर पीपल्स बँक संचालक संजय चौधरी, सामाजिक कार्यकर्ते भालेराव माळी, दहिवद येथील संभाजी पाटील, नारायण राजपूत, चुनिलाल पावरा, भिकन सुर्यवंशी, अशोक पावरा, प्रकाश पाटील, वसंत सुर्यवंशी, पंडित मोरे, भगवान सुर्यवंशी, किरण शेलार, पिंटू सुर्यवंशी, शरद सुर्यवंशी, धाकलू गवळी, गुलाब दोरीक, किशोर कोळी, पंचक्रोशीतील शेतकरी, ग्रामस्थ, शिरपूर पॅटर्न टीम उपस्थित होते.
प्रास्ताविकात भैय्या चव्हाण म्हणाले, भाईंच्या आशीर्वादाने दहिवद येथील या पाच बंधाऱ्यामुळे कोट्यवधी लिटर पाणी जमिनीत जाणार असून मुबलक पाणीसाठा होणार आहे. तसेच गेल्यावेळीभाईंनीच सर्व यंत्र सामग्री पाठवून पांझर तलाव खोलीकरण आधीच पूर्ण करुन दिले असल्याने तिथेदेखील मुबलक पाणीसाठा जमिनीत तयार झाला आहे. म्हणून गावाच्या वतीने पटेल परिवाराचे मनापासून आभार मानतो असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन भैय्या चव्हाण यांनी करुन आभार मानले.
Tags
news
