शिरपूर : दुधारे स्पोर्ट्स फाऊंडेशन नाशिक यांच्या वतीने नाशिक विभागातील क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय खेळाडू घडविणाऱ्या प्रशिक्षकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो आणि या पुरस्कारासाठी क्रिकेट प्रशिक्षक पूजा जैन यांची निवड झालेली असून येत्या 23 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी साडेचार वाजता हा पुरस्कार सोहळा नाशिक येथे पार पडणार आहे.
पूजा जैन रणजी क्रिकेटपटू असून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १९ वर्षे खालील मुलींच्या संघाकडून सलग पाच वर्षे, २३ वर्षे खालील संघाकडून एक वर्षे, रणजी संघाकडून दोन वर्षे तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संघाकडून सलग तीन वर्षे प्रतिनिधित्व करणारी ती पहिली खान्देशची महिला क्रिकेटपटू आहे. तिच्या प्रशिक्षणा खाली मुलींचा १७ वर्षे खालील संघ हा शालेय राज्यपातळी स्तरापर्यंत पोहोचला आहे.
श्री विले पार्ले केळवणी मंडळ संचलित मुकेश आर. पटेल सीबीएसई स्कूल तांडे ता. शिरपूर येथे क्रीडा प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे.
पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्था अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल, सर्व ट्रस्टी, प्राचार्य सुभाष नायर, छत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे, धुळे जिल्हा तलवारबाजी संघटनेचे सचिव कैलास कंखरे यांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
Tags
news
