धुळे, दि. 22 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील 390 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठी 28 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता सर्व संबंधित तहसील कार्यालयांमध्ये सोडत सभेचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सर्व संबंधित तहसीलदारांना दिले आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील (प्रशासन) यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.
तसेच धुळे जिल्ह्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी (साक्री व शिरपूर या तालुक्यातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या महिला आरक्षणासह) संबंधित उपविभागीय अधिकारी निश्चित करतील त्या ठिकाणी त्यांच्या अध्यक्षतेखाली 1 फेब्रुवारी 2021 रोजी महिला आरक्षणाची सोडत सभा आयोजित करण्यात येईल, असेही उपजिल्हाधिकारी श्रीमती पाटील यांनी म्हटले आहे.
Tags
news
