झुंजार फाऊंडेशनचे उत्साहत उद्घाटन संपन्न






असलोद प्रतिनिधी:-शहादा तालुक्यातील कमरावद येथे कृष्णा कोळी यांनी लोकाची सेवा व मदत करता यावी यासाठी झुंजार फाऊंडेशन नावाने सेवा भावी संस्था नोंदणीकृत करुन त्या सस्थेचा उदघाट्नाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
झुंजार फाऊंडेशन कार्यक्रमाचे उद्घाटन हेमंत सुर्यवंशी याच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष झुंजार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा कोळी हे होते तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख हेमंत सुर्यवंशी,अमरजित कुवर हे होते हा कार्यक्रम जि.प.मराठी शाळा या ठिकाणी आयोजीत करण्यात आला यावेळी शाळेतील पहीली ते चौथीच्या विस बालगोपाल विद्यार्थ्यांना वह्या,पुस्तके,पेन, झुंजार फाऊंडेशन तर्फे देण्यात आले तसेच गावातील अपघाती  मृत्यू पावलेल्या अजय कुवर याच्या परिवारास आर्थीक मदत म्हणून एकवीस शे  रुपये रोख झुंजार फाऊंडेशन तर्फे देण्यात आले.तसेच भविष्यात आपल्या गावासाठी व परिसरातील गावान मधे लोकाच्या हितासाठी वाचनालय,व्यसनममुक्ती कार्यक्रम,तरुण युवकांना व्यायामशाळा,ईतर सर्वप्रकारचे सामाजिक उपक्रम झुंजार फाऊंडेशन मार्फत राबविण्यात येतील अशी माहीती कृष्णा कोळी यांनी दिली.या कार्यक्रमालला पत्रकार विजय पाटील,कैलास सोनवने,विजय निकम  शाळेतील शिक्षक, गावातील जेष्ठ नागरिक,तरुण मित्र मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कोविड 19 चे पालन करण्यात आले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश कोळी यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी गावातील झुंजार फाऊंडेशनचे कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने