शिंदखेडा, प्रतिनिधी
सरपंच सेवा संघातर्फे दरवर्षी देण्यात येणारा आदर्श पोलिस पाटील राज्यस्तरीय पुरस्कार शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील आदर्श पोलीस पाटील युवराज माळी यांना यांना देऊन सन्मानित करण्यात आले. या निमित्ताने पोलिस पाटील संघटना सुध्दा राज्यभर सरपंच सेवा संघाच्या खांद्याला खांदा लाऊन आदर्श गावांच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया युवराज माळी यांनी दिली आहे.
सरपंच सेवा संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा नुकताच शिर्डी येथील हॉटेल जे के पॅलेस साई गोल्ड परीसरात संपन्न झाला. सरपंच सेवा संघाच्या वतीने दिला जाणारा यंदाचा आदर्श पोलिस पाटील पुरस्कार भडणे तालुका शिंदखेडा येथील पोलीस पाटील युवराज माळी यांना देण्यात आला. संस्थापक बाबासाहेब पावसे पाटील संगमनेर यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यादवराव पावसे होते. सरपंच हा ग्रामविकासाचा प्रमुख घटक आहे. त्यांनी गावाच्या विकासासाठी स्मरनात राहील असे कार्य करावे असे आवाहन समाज प्रबोधक निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी केले. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे, ग्रामसेवक युनियन चे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे, सरपंच सेवा संघटनेचे राज्याध्यक्ष भाऊ मरगळे, महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोशियन संघटनेचे राज्य अध्यक्ष महादेवराव नागरगोजे पाटील, विक्रम भोर, हरीप्रिया शुगर चे अध्यक्ष जयदिप वानखेडे, कार्यकारी संचालक अनंत ऊर्फ बाळासाहेब निकम, स्वागताध्यक्ष सरपंच प्रदीप हासे, सरपंच रविंद्र पवार यांनी सुध्दा याप्रसंगी मार्गदर्शन केले. गेल्या अनेक वर्षांपासून संपुर्ण महाराष्ट्रात आदर्श गावे निर्माण करण्यासाठी सरपंच सेवा संघ तसेच पोलिस पाटील संघटना प्रयत्नशील आहे. हे कार्य अविरत पणे सुरुच ठेवणार असल्याची प्रतिक्रिया युवराज माळी यांनी दिली आहे. विशेष म्हणजे राज्यातील कोरोना काळात सर्वच क्षेत्रातील नागरीक, पदाधिकारी यांनी समाजासाठी योगदान दिले आहे. त्यामुळे सरपंच सेवा संघातर्फे आदर्श सरपंच, आदर्श पोलीस पाटील, आदर्श पत्रकारीता, युवारत्न, प्रशासकीय सेवा, सामाजिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रातील भरीव कामगीरी करणा-यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.सोनाली म्हरसाळे, युवराज सातपुते यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सरपंच सेवा संघाचे समर्थक युवा सामाजिक कार्यकर्ते शरदराव देवकाते यांनी केले.
Tags
news
