गुणवत्तेच्या कसोटीवर तंतोतंत उतरलेला कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी.... श्री. हेमंत पाटील




शिरपूर - राजकारण, नोकरशाही किंवा अगदी उद्योग-व्यवसायाच्या क्षेत्रातही, ‘येस सर’ संस्कृतीचा उदय होण्याआधी, सुमारे तीन दशकांपूर्वी, जेव्हा राजकारणात आणि नोकरशाहीतही गुणवत्तेचाच आदर केला जायचा, तेव्हा आपल्या कर्तबगारीच्या जोरावरच महाराष्ट्राच्या पोलीस सेवेत अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी आपले नाव कोरले.ज्याला कोणत्याही अघटिताचा अगोदरच वास येतो, तो सर्वात यशस्वी पोलीस अधिकारी ठरतो असे म्हटले जाते. सामान्य माणसाला काहीसे दुर्लभच असलेले सहावे इंद्रिय (सिक्स्थ सेन्स) कमालीचे कार्यक्षम असणे ही पोलीस अधिकाऱ्याची गुणवत्ता ठरते. या गुणवत्तेच्या कसोटीवर तंतोतंत उतरलेला पोलीस अधिकारी म्हणून श्री हेमंत सुभाष पाटील यांचे नाव घेतले जाते.जळगाव जिल्ह्यातील असणारे हेमंत पाटील यांनी सन 2004 मध्ये महाराष्ट्र पोलीस सेवेत नियुक्ती झाली. एक शिस्तप्रिय, निष्ठावान व कर्तव्यनिष्ठ  अधिकारी म्हणून पोलीस दलात त्यांची ओळख आहे.
               फेब्रुवारी 2020 पासून ते शिरपूर पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावत आहेत. झपाट्याने वाढणाऱ्या शिरपूर शहरात हजारोच्या वर नागरिक राहतात. अशावेळी त्यांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते अशी परिस्थिती असताना “या शहरासाठी मी काय करणार? हे मी केवळ तोंडी न सांगता माझे कामच बोलेल”, असे उद्गार त्यांनी पदभार स्विकारल्यानंतर व्यक्त केले होते.पोलीस हे घरापेक्षा अधिक वेळ कार्यालयात आपले कर्तव्य बजावत असतात. त्यामुळे पोलीस ठाणे अथवा कार्यालय पोलिसांसाठी घरापेक्षाही महत्वाची जागा असते, असे ते आवर्जून सांगतात.पोलीस चौकीत आलेल्या नागरिकांना पोलिसांनी सौजन्यपूर्ण वागणूक द्यावी असे ते आवर्जून सांगतात.
स्वत:चा मोबाईल क्रमांक जाहीर करुन नागरिकांना त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तो उपलब्ध करुन देणारे शिरपूर शहराचे पाहिले पोलीस निरीक्षक आहेत.आपल्या कार्यपद्धतीतुन त्यांनी समान्याप्रति असणारी आत्मीयता दाखवून दिली आहे.
सर्वोच्च पद केवळ अधिकार गाजविण्यासाठी नव्हे, तर प्रत्येक कर्मचाऱ्याची काळजी घेण्यासाठी असते, याची जाणीव असलेले श्री हेमंत पाटील हे धुळे जिल्हा पोलिस सेवेत काम करत आहेत. आदरणीय सरांना, ‘झुकणे’ माहीत नाहीये, म्हणूनच धुळे जिल्हा तसेच सध्या शिरपूर पोलीस दलाचा महाराष्ट्रात दबदबा असलेला दिसून येतो.सामान्य जनता आणि समाजाशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झाले. केवळ अधिकारी म्हणून  वावरण्यापलीकडे, माणूस म्हणून परस्परांशी वागण्यासाठी स्वभावात एक वेगळे रसायन जपणे आवश्यक असते. आदरणीय सरांनी ते जपले, म्हणून शिरपूर मधील शिक्षकतज्ञ,क्रिडाक्षेत्रातील, राजकारणी,समाजकर्णी, आदींनी  सरांना सन्मान दिल्याल्याचं पाहायला मिळतंय. लाल फीतशाहीवर अवलंबून नसलेला हा अधिकारी आपल्या निर्णयक्षमतेमुळे धुळे पोलीस दलाचा आदर्श बनला आणि निर्भीडपणे गुंडगिरीचा बीमोड करण्यासाठीही तेवढय़ाच कठोरपणे अधिकाराचाही वापर त्यांनी केल्याचे दिसत आहे.
श्री हेमंत पाटील सर यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे, त्यांना सन 2019 मध्ये खडतर सेवा पोलीस पदक व त्याच साली अंतर्गत सुरक्षा पोलीस पदक देवून गौरविले आहे. उद्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सरांना पोलीस सेवेतील प्रशंसनीय कार्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री पदकाने गौरविण्यात येणार आहे. अशा या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याला व त्याच्या कार्याला सलाम.....
*डॉ एल के प्रताळे*
क्रीडासंचालक,एस.पी.डी.एम महाविद्यालय ,शिरपूर

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने