शिरपूर प्रतिनिधी- शिरपूर तालुक्यातील तालुका पोलीस स्टेशन सांगवी पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांना गोपनीय बातमीदार द्वारे माहिती प्राप्त झाली होती व व्हीआयपी कार मधून गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने तालुका पोलीस स्टेशन मे एक पथक तयार करून सापळा रचून कारवाई केली असता आठ लाख 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल व गांजा व गांजा सदुद्य पदार्थ जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि.31 रोजी सुळे ता शिरपूर शिवारात नदीच्या पुढे भोईटी ते सुळे अंतरावर बोलेनो कार क्र.एम पी 13 सी सी 8573 या गाडीला दुपारी 2 वाजता अडवून चौकशी केली असता या गाडीत 1,63,000 रुपये किंमतीचे पांढऱ्या रंगाच्या गोणीत गांजा सदुद्य पदार्थ पान, बिया , काड्यांचा चुरा असे पदार्थ, 7 लाख रुपये किमतीचे माल वाहतूक करणारे वाहन, 7 हजार रुपये किमतीचा एक मोबाइल असे एकूण 8 लाख 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी रविकुमार बागुलालजी सोनपरख वय 42 राहणार नागर रोड उज्जेन आणि नितेश किशोर ठाकूर वय 30 राहणार खांडवा रोड इंदोर यांच्या विरोधात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक धुळे चिन्मय पंडित सो, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव सो, उप विभागीय पोलिस अधिकारी अनिल माने सो यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील , पोलीस उप निरीक्षक दीपक वारे, पो. ना.संजीव जाधव यांच्या पथकाने केली आहे .
Tags
news
