थाळनेर- माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शिरपुर तालुक्यातुन थाळनेर गावाची निवड झालेली आहे त्या अनुशंगाने शासन निर्णयानुसार थाळनेर ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच प्रशांतभाऊ निकम यांनी दिनांक १ जानेवारी २०२१रोजी ग्रामपंचायत सदस्य थाळनेर ग्रामस्थ ग्रामपंचायत कर्मचारी यांना हरित शपथ देउन वसुंधरा अभियानाबद्द्ल उपहस्थितांना मार्गदर्शन केले
त्या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते. सर्व शासकीय अधिकारी यांनी गावकरी यांच्या सहयोगाने सदरचे अभियान यशस्वीपणे राबवून उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबत सरपंच यांनी मार्गदर्शन करून आपले मनोगत व्यक्त केले.
Tags
news
