होळनांथे गावात गणपती डेंटल क्लीनिक च्या शुभारंभ





शिरपूर प्रतिनिधी - होळ नांथे व  परिसरातील नागरिकांच्या जन आरोग्य सेवा व कोरोना काळात संसर्गजन्य महा मारी पासून सर्वांचे रक्षण व्हावे म्हणून गणपती डेंटल क्लिनिक या दवाखान्याचे उद्घाटन एक जानेवारी रोजी   होळनांथे येथील डॉक्टर बी. एम .खानकरी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी होळनांथे व परिसरातील नागरिक व डॉक्टर उपस्थित होते. ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्यासाठी डॉक्टर निलेश सूर्यवंशी व  डॉक्टर हनुमंतराव सूर्यवंशी यांनी या दवाखाना चा शुभारंभ केला आहे. या दवाखान्याच्या माध्यमातून रूट कॅनल ,एक्स-रे, कृत्रिम दात बसवणे व दातांचे विविध उपचार करण्यात येणार आहेत ,.त्यामुळे दातांच्या विविध समस्यांसाठी आता नागरिकांना शहरात किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची गरज नाही ही सुविधा आता  गणपती डेंटल क्लिनिक यामाध्यमातून होळनांथे  येथे उपलब्ध झाली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने