जनतेने असलोद ग्रा.प.बिनविरोध करुन गावात एकोपा टिकवावा !



कृष्णा कोळी 9823983435

शहादा तालुका  प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील असलोद ग्रा.प.निवडणुकीचे वारे जोरावर असुन ईच्छुक उमेदवाराची फार्म भरण्याची धावपळ गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू होती ती तिस तारखेला बंध झाली आहे.या पंचवार्षिक निवडणुकीत असलोद गावातील सर्व जनतेची  आपली ग्रा.प.निवडणुक बिनविरोध व्हावी अशी प्रमाणिक ईच्छा आहे.निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी गावातील सर्व तरुणांनी कंबर कसली असुन एक सभेच आयोजन देखील केले त्यात काही हवशे नवशानी विरोध केल्याने बिनविरोध निवडणुकीचे असलोद गावकऱ्याचे स्वप्न भंग केल्याने असलोद  ग्रामपंचायतीतील चार वार्डात अकरा जागासाठी एकुण शेचाळीस लोकानी फार्म भरले आहेत   त्यामुळे असलोद गावकऱ्याचे बिनविरोध निवडणुकीचे स्वप्न भंग होते की काय असे प्रश्न उपस्थित होत आहेत.या पंचवार्षिक निवडणुकीत पुण्यातील शिक्षीत तरुणांनी सहभाग घेतल्याने निवडणुकीत नवीन तरुण शिक्षीत चेहरे गावाच्या विकासासाठी उभे राहुन निवडणुक लढवणार आहेत त्यामुळे कोणत्या उमेदवाराचे यावेळी समीकरण  बिगडणार हे सागता येत नाही. 
*बिनविरोध सदस्याची निवडसाठी पुन्हा प्रयत्न*
असलोद गावातील तरुणांनी असलोद ग्रामपंचायत बिनविरोध व्हावी यासाठी पुन्हा प्रयत्न करणार आहेत निवडणुकीत ज्यानी ज्यानी फार्म भरले आहेत त्यांना एकत्रीत बोलावून योग्य उमेदवाराची निवड करुन उरवरीत सर्व उमेदवारानी आपले फार्म माघारी घेण्यासाठी गावातील सर्व जनता त्यांना साकडे घालणार आहे बिनवीरोध निवड व्हावी यासाठी सर्व उमेवाराची वरीष्ठ मंडळी देखील मनधरनी करणार आहेत त्यामुळे बिनविरोध निवड झाल्यास आजी माजी वरीष्ठाचा देखील आर्शीवाद लाभेल त्यासाठी त्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे.येणाऱ्या चार जानेवारी या दिवशी माघारीची शेवटची तारीख आहे आता उरलेल्या चार दिवसांत तरुणांनी गावात सर्वसामाजीक एकोपा टिकवावा यासाठी ग्रामपंचायत बिनविरोध व्हावी व गावाला विकासाच्या रोडावर आणावे असा त्याचा प्रमाणीक प्रयत्न  दिसत आहे तरी या तरुणाच्या प्रयत्नाला कुठपर्यंत यश येते याकडे सर्व गावकऱ्याचे लंक्ष लागले आहे.बिनवीरोध सदस्याची निवड न झाल्यासे गावातील   व पुण्याहून आलेली तरुण शिक्षीत मंडळी गावातील वरीष्ठाशी व सर्व पक्षीय नेत्याशी सल्लामसलत करुन सर्वसाजीक उमेदवाराचे गणित बसवुन गाव विकासासाठी पॅनल उभा करतील असे निश्र्चित मानले जात आहे.त्याच्या विरोधात कोणते पॅनल उभे राहते याची देखील उत्सुकता गावकऱ्यांना लागली असल्याचे दिसत आहे.
*बिनविरोधसाठी फार्मुला निश्र्चित*
बिनविरोध सदस्याच्या निवडीसाठी तरुण युवकांनी फार्मुला निश्र्चित केला असुन चार वार्डातील सहा आदीवासी  जागांवर  तिनी महीला व तिन पुरुष आहेत या सहा जागाचा बिनविरोध निवडीसाठी सर्वस्वी निर्णय आदीवासी, जनतेने, त्याच्यातील वरिष्ठानी,व गावातील सर्व जनतेने घ्यावा व चार वार्डातील उरवरीत एक ओबीसी पुरुष एक जनरल पुरुष व तीन महीला जनरल एकुण पाच जागेसाठी गावातील सर्व जनतेने व वरिष्ठानी बिनवीरोध सदस्याची निवड करावी असे ठरले आहे.सरपंच उपसरपंच पदासाठी आरक्षण आरक्षीत असल्याने त्याचा निर्णय बिनविरोध होतील त्या सदस्यानी गावातील सर्व जनतेला विश्वासात घेवुन सरपंच उप सरपंच याची देखील निवड बिनविरोध करावी असे सर्व गावातील तरुणांनी बिनविरोध निवडचा फार्मुला निश्चीत केला आहे.या फार्मुल्यावर निर्णय होतो कीवा नाही याबाबत आता सागता येणार नाही हे आता येणारी वेळेच सागेल .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने