पार्टीसाठी पाच हजाराची मागणी ,नकार दिल्याने मोटार वाहन निरीक्षकास मारहाण




 शिरपूर प्रतिनिधी - 31डिसेंबर थर्टीफर्स्टच्या पार्टीसाठी पाच हजार रुपयांची मागणी करून त्यास नकार दिल्यामुळे थेट मोटार वाहन निरीक्षक यांना मारहाण केल्याची घटना शिरपूर तालुक्यातील हाडाखेड येथील सीमा तपासणी नाक्यावर घडली आहे .आपण गावाचे सरपंच आहोत आणि 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी पाच हजार रुपये द्या अशी मागणी सुरज अत्तर सिंग पावरा रा. हाडाखेड यांनी सीमा तपासणी नाक्यावर येऊन मोटार वाहन निरीक्षक महेश देशमुख यांच्याकडे केली. देशमुख यांनी पैसे देण्यास नकार दिला असता सदर इसमाने शासकीय कामात अडथळा निर्माण करून मोटार वाहन निरीक्षक यांना धमकी दिली तुम्ही माझ्या एरियात काम करतात त्यामुळेच मी तुम्हाला बघून घेईल अशी धमकी दिली .दिनांक 1 जानेवारी रोजी 02:50 वा या सुमारास सदर इसम पुन्हा दारूच्या नशेत सीमा तपासणी नाक्यावर येऊन दमदाटी करू लागला त्यास निरीक्षक देशमुख यांनी जाण्यास सांगितले असता त्याने कॉलर पकडून आता बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली .त्यामुळे शर्टवरील प्लेट तुटल्याने खाली पडली .सहकारी मोटर वाहन निरीक्षक पद्माकर गोरक्षनाथ पाटील यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपी यांनी मोटार वाहन निरीक्षक  यांना धमकी दिल्यामुळे मोटार वाहन निरीक्षक देशमुख यांच्या फिर्यादीवरून आरोपीच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणणे कलम 353 व शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने