भोरटेककर ग्रामस्थांना लोकनियुक्त सरपंचांनी दिली नविन वर्षाची अनोखी भेट...




शिरपूर तालुक्यातील भोरटेक गावात लोकनियुक्त सरपंच सौ.ज्योतीताई सुरेश पाटील यांच्या कडे ग्रामपंचायत सत्ता आल्यापासून गावात अनेकविध योजना राबविल्या जात आहेत.. आज त्यात अजून सगळ्या गावासाठी स्वर्गीय तपनभाई पटेल यांच्या स्मरणार्थ मोफत पिठाची गिरणी साठी भूमीपूजन करण्यात आले. महाराष्ट्रात पाटोदा गावानंतर गावासाठी मोफत दळण पिठगिरणी सुरु करणारे भोरटेक गाव दुसऱ्या क्रमांकाचे नावारुपास आले आहे. निलाई प्रतिष्ठाणचेअध्यक्ष श्री तात्यासाहेब सुरेश लुका पाटील व ग्रामपंचायत सदस्य हे सर्व विकासकामांचे नियोजन करीत आहेत. विकासरत्न अमरीशभाई पटेल यांच्या हस्ते पिठ गिरणीचे लोकार्पण होणार आहे.मा.आमदार काशिराम दादा , जि.प.अध्यक्ष मा.तुषार रंधे , मा.भुपेशभाई पटेल , मा.अशोक बापू कलाल , मा.प्रा.संजय पाटील सदस्य- जि.प.धुळे , पंचायत समिती उपसभापती योगेश बोरसे , अजंदे बुद्रुक सरपंच चंद्रकांत पाटील व परीसरातील सरपंच , विविध पदांवरील मान्यवर ह्या कार्यक्रमाचे अतिथी राहतील. गावासाठी विविध योजना राबविण्याचा विडा विद्यमान सरपंचांनी उचलला असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी 
 *भोरटेक फाटा ते गावापर्यंत LED पथदिवे लावून गावासाठी दिवाळीपूर्वीच जणू रोषनाई भेट दिली आहे. गल्लीतले रस्ते तयार करणे, स्मशानभूमीचा 40 फुटी रस्ता तयार करणे, पिण्यासाठी RO पाणी , वृक्षलागवड स्पर्धा, 100% सुली अभियान व पारीतोषिक वितरण , कोरोना योद्ध्यांचा सन्मानपत्र  देवून गौरव , गावात तरुणांसाठी व्यायामशाळा , मरीमातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार , अंगणवाडी सुशोभिकरण, डिजीटल स्कूल अशी अनेक लोकोपयोगी कामे झाली असून अजून बरीच कामे करण्याचा त्यांचा संकल्प आहे.
आजच्या कार्यक्रमात लोकनियुक्त सरपंच सौ.ज्योतीताई सुरेश पाटील उपसरपंच श्री रघुनाथ गंभीर चौधरी ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र बळीराम जाधव अनिल उखा शिरसाठ हिरू बाई प्रदीप चौधरी यमुनाबाई भाईदास जाधव वानिता वसंत कोळी सुभाष हरी भील ग्रामपंचायत शिपाई चुडामन बंडू कोळी गावातील प्रतिष्ठित नागरिक संदीप शिवाजी गोड लालचंद जाधव प्रदीप प्रल्हाद गॉड प्रकाश पुंडलिक जाधव नामदेव छगन जाधव सौ राणी मुकेश जाधव मिराबाई साहेबराव जाधव शोभाबाई विक्रम जाधव , ज्ञानेश्वर एकनाथ जाधव , पंकज राजेंद्र जाधव  संपूर्ण ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी तात्यासाहेब सुरेश यांनी उपस्थितांचे आभार मानलेत व लोकार्पण सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले..

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने