शिरपूर : येथील एच. आर. पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या वतीने नववर्षाच्या स्वागतपर शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचारी यांना सामाजिक कृतज्ञतेचा भाव राखत फेस मास्क व कृतज्ञता पत्र नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल व मुख्याधिकारी अमोल बागुल यांच्याकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. बारी यांच्या हस्ते सुपूर्त करून नववर्षाचे अनोखे स्वागत केले.
यावेळी नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, मुख्याधिकारी अमोल बागुल, नगरसेविका संगीता देवरे, महाविद्यालयाचे शैक्षणिक समन्वयक डॉ. प्रवीण पाटील, नगरपरिषदेचे
प्रशासकीय अधिकारी संजय हसवाणी, प्रा. प्रशांत पाटील, प्रा. झमीर खान, नगरसेवक बंधू भगिनी आदि उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सदर करत करोना बाबत जनजागृती केली व उपस्थितांना करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक नियमांबाबत अवगत केले. यावेळी नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल यांनी सदर उपक्रमाचे स्वागत करत पथनाट्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच उपस्थितांना करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाळावयाच्या नियमांचे पालन करून प्रशासनावरचा ताण हलका करण्याचे आवाहन केले. मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी या कृतज्ञतेबद्दल धन्यवाद देत विद्यार्थ्यांना माझी वसुंधरा अभियानासारख्या शासनाच्या इतर स्वच्छता व पर्यावरणपूरक उपक्रमांबद्दल अवगत केले.
पथनाट्यात प्रेमनाथ सांगळे, अतुल सूर्यवंशी, मीनल पाटील, सायली पाटील, गायत्री भामरे, कुणाल बागड, सागर पाटील, अंकिता पाटील, जागृती अहिरे इ. विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला.
कार्यक्रमासाठी योगेश ठाकूर, कपिल धनगर, मंगेश माळी यांनी परिश्रम घेतले.
Tags
news
