शिरपूर- शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या विविध समिती सभापतींची निवड बिनविरोध झाली असून माजीशालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली 1985 पासून बिनविरोध निवडीची परंपरा कायम राहिली आहे.
शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या सभागृहात जिल्हाधिकारी, धुळे यांचे कडील आदेशानुसार विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी सभा दि. 01/01/2021 रोजी दुपारी 12 वाजता पिठासीन अधिकारी तथा तहसिलदार आबा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद कार्यालयात घेण्यात आली. तत्पुर्वी नामनिर्देशन सकाळी 10 ते 12 वाजे पावेतो मुख्याधिकारी अमोल बागुल यांचे कडे नगरपरिषद कार्यलायात स्वीकारण्याल आले. पिठासीन अधिकारी तथा तहसिलदार आबा महाजन यांनी सभेची सुरुवात केली व प्राप्त नामनिर्दशन नुसार सर्व सभापती यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे जाहीर केले. सर्व नवनिर्वाचित सभापती व समिती सदस्यांची नावे पिठासीन अधिकारी यांनी सभेत वाचुन दाखविली. नवनिर्वाचीत सभापती व सदस्यांचे अभिनंदन करुन व उपस्थित सदस्यांचे आभार मानून पिठासीन अधिकारी यांनी सभा संपल्याचे जाहीर केले.
विषय समित्यांचे सभापती व स्थायी समितीची निवड बिनविरोध झाली. सर्व नवनिर्वाचित सभापती व पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आ. काशिराम पावरा, लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनी कौतुक केले.
सर्व विषय समित्या सभापती, सदस्य, स्थायी समिती पुढीलप्रमाणे.
सार्वजनिक बांधकाम समिती : सभापती ईशी छाया शामकांत, सोनवणे रंजनाबाई विठ्ठलराव, सोनवणे चंद्रकांत बिसन, बागुल आशा राजेश, देवरे संगिता राजेंद्र, खाटिक सलिम अ. रज्जाक, कुरेशी मुमताज रज्जाक, पाटील मोहन हुलेसिंग, राजपूत राजेंद्र गुलाबसिंग, किरण यशवंत दलाल.
शिक्षण समिती : सभापती सोनार रेखा सोनू, चव्हाण प्रभाकरराव तुकाराम, मिर्झा इरफानबेग मुशिरबेग, देवरे संगिता राजेंद्र, सोनवणे रंजनाबाई विठ्ठलराव, सावळे गणेश केशव, गिरासे हर्षल विजयसिंग, देवेंद्र जामसिंग पाटील, हेमंत गुलाबराव पाटील, मोनिका रोहित शेटे.
स्वच्छता विषयक वैदयकीय आणि आरोग्य समिती : सभापती शेख नाजेराबी कमरोद्दिन, सोनवणे चंद्रकांत बिसन, माळी चंद्रकला संतोष, खाटीक संलिम अ. रज्जाक, गवळी हेमलता सुभाष, भिल लक्ष्मीबाई दशरथ, कुरेशी मुमताज रज्जाक, बबन रावजी चौधरी, रंधे रोहित विजय, साळुंखे सुलोचना वासूदेव.
पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती : सभापती दिपक महादू माळी, अहिरे उज्वला सुरेश, देवरे वैशाली वासुदेव, माळी चंद्रकला संतोष, भिल लक्ष्मीबाई दशरथ, सावळे गणेश केशव, गवळी हेमलता सुभाष, देवेंद्र जामसिंग पाटील, रंधे रोहित विजय, राजेंद्र गुलाबसिंग राजपूत.
नियोजन व विकास समिती : पदसिध्द सभापती पटेल भूपेशभाई रसिकलाल, चव्हाण प्रभाकरराव तुकाराम, संदिप जयराम शिरसाठ, देवेंद्र जामसिंग पाटील, माळी चंद्रकला संतोष, गिरासे हर्षल विजयसिंग, इरफानबेग मुशिरबेग मिर्झा, मोहन हुलेसिंग पाटील, राजेंद्र गुलाबसिंग राजपूत, बबन रावजी चौधरी.
महिला व बालकल्याण समिती : सभापती थोरात अरुणा बापू, गिरासे हर्षल विजयसिंग, संदिप जयराम शिरसाठ, गवळी हेमलता सुभाष, बागुल आशा राजेश, देवरे वैशाली वासुदेव, अहिरे उज्वला सुरेश, देवरे संगिता राजेंद्र, साळुंखे सुलोचना वासुदेव, शेटे मोनिका रोहित.
स्थायी समिती सदस्य पटेल जयश्रीबेन अमरिशभाई (सभापती तथा लोकनियुक्त नगराध्यक्षा), पटेल भुपेशभाई रसिकलाल (पदसिध्द सभापती तथा उपनराध्यक्ष), ईशी छाया शामकांत (सभासद), शेख नाजेराबी कमोरोद्दीन (सभासद), सोनार रेखा सोनू (सभासद), दिपक महादू माळी (सभासद), थोरात अरुणा बापू (सभासद), चव्हाण प्रभाकरराव तुकाराम (सभासद), इरफानबेग मुशिरबेग मिर्झा (सभासद), पाटील चंदनसिंग डोंगरसिंग (सभासद).
सभेचे कामकाज मुख्याधिकारी अमोल बागुल, प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी, निवडणुक विभाग प्रमुख भाईदास भोई, नगर अभियंता माधवराव पाटील, सचिन ढोले, सागर कुलकर्णी, निलेश शिरसाठ यांनी पाहिले.
Tags
news
