बभळाज - तरडी तालुका शिरपूर येथील हीलाल गोपीचंद पाटील यांच्या शेतीतील व निम्मे हीस्यावर शेती करणारे पुंडलीक बाबुराव पाटील या शेतक-यांची पंधरा दिवसात दोन वेळा पाच एकरमध्ये लावलेली पस्तीसशे ते चार हजार केळीची झाडे कोयत्याने कापुन उध्वस्त करण्यात आली आहे. पंधरा दिवसांपूर्वी १२ जानेवारी रोजी ८०० ते १००० केळीची झाडे कापुन उध्वस्त करण्यात आली या बाबतीत थाळनेर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे व बुधवारी रात्री पुन्हा २५०० ते ३००० झाडे कापुन उध्वस्त करण्यात आल्याने दोन्ही शेतकरी उध्वस्त झाले असुन डोक्यावर कर्जाचा भार वाढल्याने आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचे दोन्ही शेतकऱ्यांनी सांगीतले. हीलाल पाटील यांच्याकडे चौदा एकर शेती होती. गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून वर्षातुन दोन वेळा पीक घेतात परंतु हे पीक दरवर्षी दोन्हीवेळा अज्ञाताकडुन नष्ट केले जात आहे.यामुळे दर वर्षी लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याने कर्जात वाढ होत आहे. त्यांना कर्ज फेडण्यासाठी आत्तापर्यंत तीन वेळा नऊ एकर शेती विकावी लागली असुन उरलेली शेती त्यांनी पुंडलीक पाटील यांना केळी लागवडीसाठी निम्मे बटाई तत्त्वावर दीली आहे.दोघांनी कर्ज काढून केळीची लागवड केली होती.हीलाल पाटील यांच्यावर चार ते पाच लाख व पुंडलीक पाटील यांच्यावर तीन लाख रु बॅंकेचे कर्ज आहे.हीलाल पाटील यांच्या परीवारत नऊ सदस्य असुन उदर निर्वाह कसा करावा असे सांगताना त्यांना रडु कोसळले.या वेळी सर्व उपस्थीतांचे ही डोळे पाणावले. वीस वर्षांत मीरची, कापुस,भेंडी, केळी अशी सर्व पिके नष्ट केले जात आहे एवढेच नव्हे तर शेतातला चारीही पेटवला जात आहे.शेतातील इतर वस्तुंची ही सतत नासधूस केली जात आहे.विशेष म्हणजे आजुबाजुला असणा-या शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होत नाही गावात हे फक्त हीलाल पाटील यांच्या सोबतच होत आहे.याचे परीसरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.पंधरा दिवसांपूर्वी १२ जानेवारी रोजी केळी कापल्यानंतर दोन्ही शेतकरी रोज शेतात जात होते.बुधवारी शेतात गेले नसता रात्रीला पुन्हा केळी कापुन उध्वस्त करण्यात आली. या बाबतीत वेळोवेळी पोलीसांना कळविण्यात आले आहे. तरी तात्काळ तपास करुन पोलीसांनी आरोपी जेरबंद करावे व शासनाने आर्थिक मदत करावी अशी विनंती केली आहे अंन्यथा आम्हांला आत्महत्या करावी लागेल असे सांगितले.
