शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार छापा टाकून कार्यवाही केली असता मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या पिकअप मधून बिअर साठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे .
दिनांक 30 जानेवारी रोजी सदर माहितीच्या आधारे तालुका पोलिस स्टेशनचे पथक तयार करून महाराष्ट्र-मध्यप्रदेश लगत संशयित वाहनाचा शोध घेतला असता दुपारी दोन वाजेच्या सुमारास नवापाडा गावालगत काही अंतरावर रोहिणी ते खंबाळे कडे एक महिंद्रा बोलेरो पिकप येताना दिसून आला सदर पिकप चालकाने देखील समोरून पोलीस गाडी येत असल्याचे पाहताच भररस्त्यात त्याच्या ताब्यातील पिकप क्रमांक एम. एच.19
एस 6504 सोडून गाडीतून रस्त्यालगतच्या झाडांच्या फायदा घेऊन पळून गेला. सदर पिकप ची तपासणी केली असता त्या पिकप त्यामागील सामान ठेवण्याच्या जागी माऊंटन सुपर स्ट्रॉंग 6000 त्यात 648 च्या बाटल्या मिळून आल्या सदर मालाची किंमत 87 हजार 480 इतकी असून महिंद्रा पिकप वाहनांची किंमत पाच लाख रुपये असे एकूण पाच लाख 87 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तालुका पोलीस ठाण्यात दारूबंदी कायदा कलम 65 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित ,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय देवरे, हेमंत पाटील, पोलीस नाईक संजय जाधव, पोलीस कॉन्स्टेबल गोविंद कोळी ,योगेश मोरे, अशोक पाटील ,मयुर पाटील इत्यादींच्या पथकाने केली आहे
Tags
news
