शिरपूर तालुक्यातील तोंदे येथील गरीब महिला तुपाबाई गोसावी यांना खूप महिन्यांपासून पोटाचा त्रास होत होता , डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला परंतु तुपाबाई पैशांअभावी त्रास अंगावर काढत होत्या. शेवटी वेदना असह्य झाल्यावर तोंदे गावातील माजी सरपंच महेश चौधरी (बाबा) यांना भेटून होणाऱ्या त्रासाविषयी माहिती दिली असता बाबा यांनी गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे आरोग्यदूत डॉ जितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. डॉ जितेंद्र ठाकूर यांनी सर्व तपासणी करून ऑपरेशन अत्यावश्यक असल्याचे सांगितले. खर्च जास्त असल्याने डॉक्टर साहेबांनीच सर्व काही मदत करण्याची सर्वांनी सांगितल्यावर डॉ जितेंद्र ठाकूर यांनी क्षणाचाही विचार न करता पैशापेक्षा गरीब महिलेचा जीव महत्वाचे असल्याचे सांगत महिलेला ऍडमिट करून घेऊन एक रुपयाही न घेता मोफत ऑपरेशन करून पोटातून सुमारे साडेआठ (8.500kg) किलोचा गोळा काढून
या गरीब महिलेला जीवदान दिले. लागलीच सर्व उपचार घेऊन श्री सिद्धेश्वर हॉस्पिटल मधून सुखरूप घरी सुटी करण्यात आली.
आरोग्यदूत डॉ जितेंद्र ठाकूर साहेबांनी यापूर्वी देखील अनेक गोरगरिबांना मदत करून मोफत ऑपरेशन करून दिल्याचे व विशेषतः 10 किलो पर्यंत चे गोळे पोटातून काढून अनेक महिलांचे प्राण वाचवलेले आहेत आणि आता पुन्हा माणुसकी दाखवून या गरीब महिलेचे प्राण वाचवल्याबद्दल तोंदे चे माजी सरपंच बाबा चौधरी यांसह तुपाबाई गोसावी आणि त्यांच्या परिवाराने डॉ जितेंद्र ठाकूर साहेबांचे आभार मानले.
Tags
news
