शिरपूर : दि शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित आर. सी. पटेल पॉलिटेक्निकचे प्राचार्य नवीन गुरूमुखदास हासवाणी यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या विद्याशाखेच्या अंतर्गत डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.
“एनर्जी एफीसीयंट वायरलेस सेंसर नेटवर्क” हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. यासाठी त्यांना आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद देवरे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. या संशोधन अंतर्गत तयार करण्यात आलेल्या वायरलेस अंडरग्राउंड ड्रेनेज कन्जेशन सिस्टीमसाठी त्यांना राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग (महाराष्ट्र राज्य) यांचे 3.50 लक्ष रुपयांचे अनुदान कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मार्फत प्राप्त झाले. त्यांच्या या संशोधनाचा उपयोग स्वच्छ सर्वेक्षण अभियान-2018 मध्ये करण्यात आल्यामुळे शिरपूर नगरपालिकेतर्फे त्यांचे कौतुक करण्यात आले.
आजपर्यंत त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या परीसंवाद व परीषदांमध्ये सक्रीय सहभाग नोंदविला असून त्यांचे संशोधनपर निबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शोधपत्रिकेत प्रकाशित झालेले आहेत. या संशोधनाच्या वापरामुळे अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम ब्लॉक होण्यापुर्वीच संबंधीत अधिकाऱ्याला संदेश पाठविला जाईल व त्यामुळे साथीच्या रोगांचे प्रश्न, सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे प्रश्न व पर्यायानेच पर्यावरणासंबधीत प्रश्न आपोआप सुटतील.
प्राचार्य नविन जी. हासवाणी यांच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भुपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
Tags
news
