शिरपूर : शिरपूर शहरातील प्रभाग क्र. ९ येथे प्रत्येक घरोघरी स्वच्छ सर्वेक्षण आणि वेब पोर्टल द्वारे हरित शपथ घेण्यात आली. प्रभागाचे नगरसेवक प्रभाकरराव चव्हाण व बांधकाम समिती सभापती सौ. छाया शामकांत ईशी यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
राज्य शासनातर्फे संपूर्ण राज्यात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून शिरपूर वरवाडे नगर परिषद अंतर्गत संपूर्ण शहरात स्वछ सर्वेक्षण अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत शहरातील प्रभाग क्र. ९ येथे माजी मंत्री आ. अमरिशभाई पटेल, लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल,-उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष राजगोपाल भंडारी यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाच्या नगरसेविका तथा बांधकाम समिती सभापती सौ. छायाताई शामकांत ईशी यांच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षण आणि वेब पोर्टल द्वारे हरित शपथ योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी घरोघरी जाऊन घरातील प्रत्येक व्यक्तीला मोबाईल द्वारे माहिती देऊन अपडेट करून शपथ देण्यात आली.
याप्रसंगी नगरसेवक प्रभाकरराव चव्हाण, महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष शामकांत ईशी, नगरसेवक इरफान मिर्झा, माळी समाज अध्यक्ष बाबुलाल माळी, जयेश महाजन, वि. का. सोसायटी चेअरमन दुर्गेश चौधरी, एन.एस.यु.आय. जिल्हाध्यक्ष संदीप माळी, तेली समाज उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, महेश चौधरी, आशिष चौधरी, दिनेश चौधरी, सुरेन्द्र चौधरी, चेतन चौधरी, संजय दगा चौधरी, रमेश महाले, उत्तम चौधरी, किशोर चव्हाण, रविंद्र माळी, सुरेश महाजन, एस. कुमार माळी, सुरेशदादा गुजराथी, राहुल माळी, सादिक खाटीक, जकीर खाटीक, हेमंत थोरात, सौ. मनीषा ओसवाल, सौ. मंजुषा चव्हाण, सौ. प्रतिभा चौधरी, सौ. भारती चौधरी, सौ. वैशाली चौधरी, श्रीमती नंदा चौधरी, सौ शोभा चौधरी, सौ. छाया चौधरी, आकाश चौधरी, सोहन चौधरी, प्रमोद मगरे, भटू माळी, दीपक माळी, गणेश भावसार, सोमा चौधरी, भरत लोहार, संदिप पाटील पेंटर, राहुल फुलारी, संदीप फुलारी, पराग जैन, अमोल पाटील,गोटू सोनवणे, मयूर ईशी, भारत सैंदाने, गिरीष थोरात, मयूर खैरनार, मिठभाकरे, प्रकाश चौधरी, जतिन जैन, परवेझ मलिक, आंबिद मंसुरी, विजय चव्हाण, दिपक माळी, उपेंद्र ओसवाल, संजय ओसवाल,राज चौधरी, प्रभागातील नागरिक महिला, पुरुष युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी भुपेशभाई फ्रेंड्स सर्कल अंतर्गत विकास योजना आपल्या दारी अभियानाचे सचिन चौधरी, भैरव राजपूत, महेश पाठक, निलेश पाटील, रोहित माळी, भुपेश साळवे, विशाल पावरा, विशाल पाटील, सचिन राजपूत व टीम यांनी विशेष परिश्रम घेतले.
Tags
news
