बभळाज - गेल्या अनेक महिन्यापासून पूर्ण जगावर कोरोणा या विषाणूचे सावट असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबींना मोठा फटका बसला होता. परंतु काही दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी मोठा निर्णय घेतला. आणि दिनांक 27 जानेवारी पासून पाचवी ते आठवी हे वर्ग सुरू करण्यासाठी शासनातर्फे परवानगी देण्यात आली. म्हणून 27 जानेवारी रोजी आर .सी .पटेल माध्यमिक विद्यालय बभळाज येथील विद्यार्थ्यांचे मास्क व गुलाब पुष्प देऊन शाळेतील प्राचार्य आर . एन. पवार , व शिक्षक बंधू भगिनी यांनी स्वागत केले. ग्रामीण भागातील बऱ्याच विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असते. म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांना मास्क विकत घेणे शक्य होत नाही. म्हणून शाळेतील उपशिक्षक तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ चे सिनेट सदस्य अमोल सोनवणे यांनी स्वखर्चाने विद्यार्थ्यांना मास्कची व्यवस्था उपलब्ध करून दिली. यावेळी शाळेतील शिक्षक बी. डी. पाटील,बी.एस .मोरे, आर. यू .पवार, एस. बी. तावडे,एम. एल. जाधव,
आर. एम. मोरे, एस. जी. वळवी,आनंद बेलगमवार, एस. एस. बोरसे, एस. के. पावरा, अमोल सोनवणे, पवन परदेशी, उपस्थित होते.उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग , सॅनिटायझर फिजिकल डिस्टन्स यांचे तंतोतंत पालन करून विद्यार्थ्यांना विद्यालयात प्रवेश देण्यात आला. तसेच फिजिकल डिस्टंसिंग, सॅनिटायझर यांचा वेळोवेळी वापर करा तसेच जर एखाद्या विद्यार्थ्यास सर्दी, खोकला, ताप या बाबी निदर्शनास आल्यावर त्याने त्याच्या पालकांना सांगून त्वरित डॉक्टरांकडे उपचारासाठी जावे
अशा सूचना विद्यालयाचे प्राचार्य आर. एन .पवार व शिक्षक बंधू-भगिनी यांच्यातर्फे देण्यात आल्या. शासनाच्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करून विद्यालयाने पाचवी ते आठवी या वर्गाचे कामकाज सुरू केले.
Tags
news
