असलोद बीएसपी गाव विकास पॅनलचा दणदणीत विजय गावाचा स्पष्ट कौल



शहादा प्रतिनिधी 9823983435 :-

शहादा तालुक्यातील असलोद ग्रामपचायतीत मुख्य पॅनल प्रमुख राजु वानखेडे व उप पॅनल प्रमुख संजय जगताप,दरबार गिरासे,जगन शिरसाठ,योगेश मराठे,तसेच बीएसपी पॅनलचे असलोद गावातील सर्व खंदे कार्यकर्ते याच्या सर्वाच्या नेतृत्वात ग्रामपंचायत निवडणुकीत असलोद बीएसपी गाव विकास पॅनलचे नऊ पैकी सात उमेदवाराचा दणदणीत विजय झाला व एक महीला उमेदवार बीनवीरोध झाली होती बीनवीरोध एक व निवडुन आलेले सात असे एकुण आठ उमेदवार बिएसपी गाव विकास पॅनलचे निवडुन आले या सर्व उमेदवारानी असलोद गावात मोठ्या उत्साहात साध्या पध्दतीने आंनद उत्सोव साजरा केला.ग्रामपंचायत निवडणुकीत गाव विकास पॅनलच्या सर्व समर्थकांनी निवडणुकीच्या कालावधीत मोठी मेहनत घेतली त्यामुळे बीएसपी गाव विकास पॅनल विजयाचा भागीदारी झाला आहे.
बीएसपी गाव विकास पॅनलने अकरा जागा पैकी एक जागा बिनविरोध झाली व नऊ जागेवर बीएसपी गाव विकास पॅनलने उमेदवार निवडणुकीच्या रिणागणात होते त्यापैकी सात जागा आल्या उरवरीत तिन जागेवर अपक्ष उमेदवार निवडुन आले.
*असे निवडुन आले उमेदवार*
वार्ड क्रमांक एक मधे महीला जागेवर सरला अजय गिरासे व पुरुष जागेवर प्रकाश गुलाब भिल हे बहुमताने निवडुन आले वार्ड क्रमाक दोन मधे एक महिला सुशीला बाई प्रकाश भिल व पुरष जागेवर विलास प्रकाश पवार व सतोष देवीदास चव्हाण हे बहुमताने निवडुन आले.वार्ड क्रमाक तिन मधे  अपक्ष महीला दोन उमेदवार त्यात नम्रता अजय सोनवने बिनविरोध व सुलोचना दिलीप पवार एक पुरुष जागेवर अजय दाजु सोनवने हे बहुमताने निवडून आले.वार्ड क्रमाक चार मधे दोन महीला निवडुन आले त्यात तुकीबाई प्रकाश भिल व रेखा लिलाचंद पवार हे बहुमताने निवडून आले या वार्डात पुरुष जागेवर दिपक भिमसींग गिरासे हे सर्व उमेदवार बहुमताने निवडून आले.
*बीएसपी गाव विकास पॅनलला गावाचा स्पष्ठ कौल*
असलोद गावातील जनतेने बीएसपी गाव विकास पॅनलला स्पष्ठ बहुमताचा कौल दिल्याने याची एक जागा बीनवीरोध झाली व सात जागा लोकशाही पध्दतीने बहुमताने निवडून आले.सर्व उमेदवाराना बहुसंख्य मतदान झाले.सर्व उमेदवारानी मोठ्या नम्रतेने साध्या पध्दतीने गावात फिरुन नतमस्तक होवुन नमस्कार करुन मतदात्याचे जाहीर आभार मानले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने