शिरपूर : येथील अशोक दगडू चौधरी यांची कन्या व रुपेश अशोक चौधरी यांची भगिनी चि.सौ. कां. पूजा तसेच चाळीसगाव येथील साहेबराव त्र्यंबक चौधरी यांचे सुपुत्र चि. विशाल यांचा साखरपपूडा दि. १८ जानेवारी २०२१ सोमवार रोजी शंकर नाना मंगल कार्यालय शिरपूर येथे आयोजित करण्यात आला. होता. त्यानुसार याठिकाणी साखरपूडा संपन्न झाल्यावर वधुवरांच्या नातलगांनी व समाजातील मान्यवरांच्या चर्चेनंतर याच ठिकाणी साखर पुडा नंतर विवाह करण्याचे ठरले व ठरल्यानुसार याच ठिकाणी काही वेळानंतर चौधरी समाजात आदर्श विवाह संपन्न झाला. याप्रसंगी तैलिक समाज महासभा धुळे जिल्हाध्यक्ष तथा शिरपूर तेली समाज पंच मंडळ अध्यक्ष बबनराव चौधरी, तैलिक महासभा युवक प्रदेश उपाध्यक्ष शामकांत ईशी, विभागीय युवक अध्यक्ष संजय चौधरी, सामाजिक कार्यकर्ते सुरेश चौधरी, चाळीसगावचे माजी नगरसेवक जगदिश चौधरी, पंच मंडळचे सचिव जगदिश चौधरी, खजिनदार संतोष चौधरी, सहसचिव रमेश चौधरी, ईश्वर चौधरी, रुपेश चौधरी, अशोक पूंजु चौधरी, सदानंद चौधरी, महेश चौधरी, नंदकिशोर चौधरी आदि मान्यवर उपस्थित होते. शिरपूर येथे चौधरी समाजातील साखरपूड्यातच हा आदर्श विवाह कोरोना काळा दरम्यान प्रथमच झाला असुन समाजातील इतरांनी हि आदर्श घ्यावा तसेच यामुळे खर्चाची हि बचत होत असते व वेळ वाचतो म्हणुन समाजातील इतरांनी हि पुढे यावे असे आवाहान तैलिक समाज महासभा धुळे जिल्हाध्यक्ष तथा शिरपूर तेली समाज पंच मंडळ अध्यक्ष बबनराव चौधरी यांनी केले आहे. या आदर्श विवाहचे समाजात सर्वत्र चर्चा होत असुन वधु वरांचे अभिनंदन होत आहे.
Tags
news