शिरपूर - हिंदु कुलसुर्य वीर शिरोमणी महाराणा प्रतापजी यांच्या बलिदान दिनानिमित्त शिरपूर शिवसेना कार्यालय येथे महाराणा प्रतापजी यांच्या जयंती दिना निमित्त बलिदान दिन साजरा करण्यात आला. राष्ट्र गौरव महाराणा प्रताप सिंह जी यांच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा देत त्यांनी देशासाठी दिलेले बलिदान व संरक्षणासाठी दिलेला लढा एक रक्तरंजित इतिहास पासून सदरच्या इतिहास नेहमीच देशाला प्रेरणा देणारा असा आहे अशा या थोर राष्ट्रपुरुषांच्या जयंतीनिमित्त त्यांनी दिलेल्या बलिदानाला विनम्र अभिवादन करण्यासाठी शिवसेना कार्यालयात आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बलिदान दिन म्हणून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
या वेळी उपजिल्हाप्रमुख भरत राजपूत, धुळे उपजिल्हा संघटक विभाभाई जोगराना, एसटी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू टेलर, तालुकाप्रमुख दिपक चोरमले, शहर प्रमुख मनोज धनगर, युवा सेना अधिकारी अनिकेत बोरसे, शहर संघटक प्रेम कुमार चौधरी, महिला आघाडी वीणाताई देशपांडे, अर्चना देसले, लक्ष्मी कोकणी, उपशहर प्रमुख योगेश ठाकरे व बंटी लांडगे, पिंटू शिंदे, जितेंद्र पाटील, तुषार महाले, दिनेश गुरव, देवाजी पाटील, राज सिसोदिया, कवन गिरासे, गणेश बिरारी, सर्व अंगिकृत संघटना उपस्थित होते
Tags
news
