शिरपूर : तालुक्यातील वाडी येथे जिल्हा परिषद लघुसिंचन विभाग अंतर्गत शिरपूर पॅटर्न अंतर्गत २५० ते २५५ व्या असे एकूण ६ बंधाऱ्यांचे भूमिपूजन माजी मंत्री आ. अमरिशभाई पटेल, आ. काशिराम पावरा, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणी चेअरमन तथा शिरपूरचे उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टी प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, शिरपूर तालुकाध्यक्ष किशोर माळी, धुळे भाजपा माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, कुवे येथील प्रगतीशिल शेतकरी सुभाष गुजर, पंचायत समिती सदस्य बबन भिल, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणी संचालक नामदेव चौधरी, प्रकाश चौधरी, अर्थे खु. सरपंच साहेबराव पाटील, अर्थे बु. सरपंच अनिल गुजर, भाजपा तालुका चिटणीस सुनिल चौधरी, वाडी सरपंच भरत भिल, उपसरपंच लोटन धनगर, कुवे भाजपा अध्यक्ष सतीश गुजर, रामसिंग राजपूत, वाडी विकासो चेअरमन रविंद्र चौधरी, वेडु भिल, उमेश पाटील, वाडी प्रगतीशिल शेतकरी रामकृष्ण पाटील, सुरेश पाटील, पदाधिकारी, ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शेतकरी बांधव व ग्रामस्थ यांनी भाईंनी सुरू केलेल्या कामांबद्दल समाधान व्यक्त केले.
माजी मंत्री आ. अमरिशभाई पटेल, आ. काशिराम पावरा व उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नाने शिरपूर तालुक्यात "शिरपूर पॅटर्न" अंतर्गत २५० पेक्षा जास्त बंधारे बांधून पूर्ण झाले असून सर्व बंधाऱ्यांमध्ये मुबलक पाणीसाठा झाल्याने त्या त्या भागातील शेतकरी बांधव व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
