म्हसावद येथे कोविड 19 लसीकरणास सुरुवात



कृष्णा कोळी प्रतिनिधी 9823983435          म्हसावद =  Covid-19 Vaccine, किती आतुरतेने वाट पाहत होते सर्वजण. तमाम भारतीयांना या लसीच्या आगमनाने सुखद धक्का बसला आहे. विशेष म्हणजे सर्व जगात भारत निर्मीत लशीचाच बोलबाला आहे. 16 जानेवारी 2021 पासुन ही लस सर्व कोरोना वॉरियर्स यांना प्राधान्याने देण्यात येत आहे. आज कोविड-19 साठी देण्यात आलेल्या सर्व सुचनांचे पालन करुन राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या वैद्यकीय अधिकारी, परिचारीका, औषधनिर्माता, इतर कर्मचारी व आशा यांनाही ही लस ग्रामीण रुग्णालय म्हसावद, ता. शहादा येथे देण्यात आली. 2020 च्या सुरुवातीला कोरोना च आगमन झालं आणि तसें संपुर्ण आरोग्य, सफाई, पोलीस अशी विविध शासकीय यंत्रणा आपल्या जिवाची बाजी लावुन कामाला लागली आणि काही जण जण सेवा देत देवघरीही गेलेत. आजही शासकीय यंत्रणा चोक काम बजावत आहेत. या साधारणतः वर्षभराच्या काळात राज्यभरातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या वैद्यकीय अधिकारी, परिचारीका व औषधनिर्माता यांनीही मोलाची सेवा दिली. नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या  वैद्यकीय अधिकारी, परिचारीका व औषधनिर्माता यांनीही कोविड रुग्णालय नंदुरबार, कोविड केअर सेंटर तसेच ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी आपल्या जिवाची पर्वा न करता कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांची वैद्यकीय सेवा केली. या कालावधीत 2 वैद्यकीय अधिकारी, 2 परिचारीका व 2 औषधनिर्माता ही कोविड-19 पॉझिटिव्ह झालेत. आज या लशीचा पहिला डोस घेवुन सर्व अधिकारी व कर्मचारी सर्व जग प्राकृतिकरित्या लवकरच पूर्वपदावर येण्याच्या आशेने पुन्हा कोरोनाला हरवण्यासाठी आपलं कर्तव्य बजावण्यास तयार झाले आहेत. जनतेनेही सामजिक अंतर ठेवणे, गर्दी टाळणे, मास्क वापरणे, वारंवार हात धुणे या नियमांचे पालन करण्याची गरज या अधिकाऱ्यांनी बोलुन दाखवली.ग्रामीण रुग्णालय म्हसावद येथे कोविड लस घेतल्यानंतर औषध निर्माण अधिकारी पवन चौधरी,
डॉ राकेश पाटील, डॉ शशिकांत पाटील, डॉ जितेंद्र भंडारी, डॉ शाम ठाकुर, मयुर निकुंभ, अजय सोनवणे, भगतसिंग वसावे, विशाल ठाकरे इत्यादी या वेळी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने