स्वा. सै. शंकर पांडू माळी प्रतिष्ठान वरवाडे तर्फे शिरपूर वरवाडे नगर परिषदेला स्वर्ग रथाची गाडी भेट




शिरपूर : शिरपूर वरवाडे नगर परिषदेत स्वा. सै. शंकर पांडू माळी प्रतिष्ठान वरवाडे तर्फे माजी उपनगराध्यक्ष वासुदेव शंकर देवरे यांच्याकडून दि. 20/01/2021रोजी सकाळी 10 वाजता नगर परिषदेला स्वर्ग रथाची गाडी भेट देण्यात आली.

याप्रसंगी वासुदेव शंकर देवरे यांनी वैयक्तिकरित्या नगरपालिकेला सुमारे साडेसहा लाख रुपये किमतीचे स्वर्ग रथ हे वाहन भेट स्वरुपात दिल्याने नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, मुख्याधिकारी अमोल बागुल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी नगरपरिषदेच्या वतीने त्यांचे आभार मानले.

शिरपूर वरवाडे नगर परिषद नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, मुख्याधिकारी अमोल बागुल, नगरसेवक प्रभाकरराव चव्हाण, छायाताई ईशी, अरूणा थोरात, वैशाली देवरे, दिपक महादू माळी, देवेंद्र राजपूत, चंदनसिंग राजपूत, चंद्रकांत सोनवणे, राजू एजंट, वसंत देवरे, नगर अभियंता माधवराव पाटील, प्रशासकीय अधिकारी संजय हासवानी, सुनील सोनवणे, अमोल पाटील, संतोष महारु माळी, श्यामकांत ईशी, काशिनाथ आबा माळी, उत्तमराव माळी, जयवंत माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत रुपये ६ लाख ५० हजार किमतीची स्वर्ग रथाची गाडी शिरपूर वरवाडे नगर परिषदेस माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली.

याप्रसंगी अधिकार माळी, हिरालाल आण्णा माळी, विनायक कोळी, नरेंद्र पाटील, फिरोज काझी, नितीन गिरासे, भिका विठ्ठल माळी, मांडळचे सरपंच सुनील माळी, भटू आप्पा माळी, भालेराव माळी, मोहन कोळी, विनायक कोळी, बापू वाघ, बापू मास्तर, विजय बागुल, 
शिक्षण मंडळ सदस्य देविदास माळी, संतोष चिंतामण माळी, डॉ. धीरज पाटील, महादू माळी, गोपाल ठाकरे, वसंत माळी, प्रवीण माळी, अविनाश माळी, विनय माळी, भरत रोकडे, राजेश सोनवणे, राजेश पगारे, ऍड. नरेंद्र कंरकाळ, बाजीराव महाले, सोमा धनगर, प्रा. जी. व्ही. पाटील, कैलास झिपा माळी, संदीप माळी, प्यारे मोहन, ईश्वर माळी, सुभाष कोळी, मोहन माळी, मनोज माळी, 
शिक्षण मंडळ सदस्य किशोर माळी, सुनील साळुंखे, मोहन कोळी, ईश्वर बोरसे, नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने