शिरपूर : तालुक्यातील झेंडेअंजन येथे युवा नेते स्व. तपनभाई पटेल नगर फलक अनावरण करण्यात आले.
झेंडेअंजन गावात दि. १६ जानेवारी रोजी तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांच्या हस्ते स्व. तपनभाई पटेल नगराचे फलक अनावरण शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
तसेच सुरुवातीला स्व. तपनभाई पटेल यांचे प्रतिमापूजन आमदार काशीराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. आर. गवळी सर यांनी केले. कार्यक्रमाला गावातील सरपंच मोतीलाल सुर्वे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना संचालक जयवंत पाडवी, रमण पावरा, एस. आर. गवळी सर, शिरपूर येथील नगरसेविका सौ. हेमलता गवळी, ग्रामपंचायत सदस्य चैत्राम गायकवाड, दिलीप गवळी, अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. आभार सरपंच मोतीलाल सुर्वे यांनी मानले.
Tags
news