शिरपूर : तालुक्यातील उमर्दा येथे कु. द्वेता भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात येऊन महिला जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.
उमर्दा येथे दि. १४ जानेवारी रोजी महिला व युवती यांच्या उपस्थितीत कु. द्वेता भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते संपूर्ण गावातील महिला व युवती यांना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.
यावेळी श्रीमती कक्कूबेन पटेल, कु. द्वेता भूपेशभाई पटेल यांच्या सह धुळे जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती मोगरा जयवांत पाडवी, येथील सरपंच जमुनाबाई वसावे, ग्रामपंचायत सदस्य गिनाबाई पाडवी, सामाजिक कार्यकर्त्या माधुरी प्रताप पाडवी, अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा कार्यकर्त्या, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, महिला ग्रामस्थ, युवती उपस्थित होते.
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे तसेच शासनाच्या नियमांचे पालन करण्यात आले. यावेळी सेवाभावी उद्देशाने तसेच ग्रामीण भागातील, आदिवासी दुर्गम भागातील महिला व युवतींना विविध आजारांबाबत द्वेता भूपेशभाई पटेल यांनी जागृती केली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर मार्गदर्शन केले. महिला, युवती यांचे आरोग्य उत्तम असावे, महिलांमध्ये आढळून येणाऱ्या अनेक आजारांविषयी मार्गदर्शन करून महिला युवतींनी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून महिला व युवतींना पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन द्वेता भूपेशभाई पटेल यांनी दिले.
Tags
news