शिरपूर तालुक्यात चाकडू ग्रामपंचायतीवर बिरसा ब्रिगेडच्या झेंडा



शिरपूर : शिरपूर तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक २०२१ मध्ये तालुक्यातील चाकडूग्रामपंचायतीत बिरसा ब्रिगेड सातपुडा विभागाच्या बिरसा शिलेदारांचा दणदणीत विजय झाला. या निवडणूकीत बिरसा ब्रिगेडच्या शिलेदारांनी चाकडू ग्रामपंचायतीसाठी ११ पैकी ९ जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला. विजय मिळालेले उमेदवार सुनिल मुखडे, कन्वरसिंग मुखडे, सुनिल रोहीदास पावरा, तुकाराम युवराज पावरा, टिवलीबाई पावरा, शानुबाई रोहिदास पावरा, मोटीबाई रायमल पावरा, दारख्या रुमाल्या पावरा, सुशिलाबाई सोना पावरा यांनी दणदणीत विजय मिळविला. झालेल्या निवडणूकीत पॅनल प्रमुख म्हणून बिरसा ब्रिगेड सातपुडाचे जिल्हा कोषाध्यक्ष आणि मार्गदर्शक म्हणून सातपुडा अध्यक्ष सुंदरलाल पावरा यांनी प्रमुख भूमिका बजावली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने