शिरपूर : येथील एच.आर.पटेल कन्या माध्यमिक विद्यालयातील इयत्ता पाचवी ची विद्यार्थिनी सायली पंकज ठाकूर हिने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेअंतर्गत कोविड जनजागृतीसाठी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत इ. १ ली ते ५ वी गटात धुळे जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले आहे.
प्रजासत्ताक दिनी या विद्यार्थिनीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात येणार आहे.
सायलीच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरीशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संस्थेचे सीईओ डॉ.उमेश शर्मा, प्राचार्य आर.बी. पाटील, पर्यवेक्षक जे.पी. पाटील यांनी कौतुक केले आहे.
Tags
news
