सांगली येथे संपन्न होणाऱ्या नाट्य संमेलन विषेशांक साठी साहित्य पाठविण्यासाठी आवाहन....!






सालाबादप्रमाणे या वर्षीही साक्षीदार प्रकाशनतर्फे नाट्य संमेलन विषेशांक प्रसिद्ध करत आहोत, गेली ४० वर्षे हा उपक्रम आम्ही यशस्वीरीत्या पार पाडत आलो आहोत. खरं पाहता हा नाट्य संमेलन विषेशांक मार्च,२०२० मध्ये वाचकांच्या पसंतीस येणार होता पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि सततच्या लॉकडाऊन मुळे मार्च २०२१ लाच सांगली येथे प्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या अध्यक्षेतेखाली संपन्न होणाऱ्या नाट्य संमेलनात या विषेशांकाचे प्रकाशन होणार आहे. तेव्हा वाचकांना आम्ही आवाहन करत आहोत कि


१) नाट्यपंढरी सांगली विषयक लेख

२) आजमितीस झालेल्या संमेलन विषयी काही गमती जमती, किस्से, गाजलेली संमेलने

अशाप्रकारच्या माहितीपूर्ण लेखाना या अंकात स्थान दिले जाणार आहे.

तेव्हा कवी, लेखक यांना आम्ही आवाहन करतो कि त्यांनी आपले साहित्य साक्षीदार प्रकाशन ., सत्यवान तेटांबे - ९८६९५०१३६८ यां नंबरवर तसेच, डी-३०३, क्रेमलिन, जयराज नगर, बोरिवली (पूर्व) , मुंबई - ४०० ०९१.या पत्त्यावर आणि satyawantetambe@rediffmail.co  आणि paartnerpublication53@gmail.com  वर पाठवावे ही नम्र विनंती.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने