भाडेकरू संघातर्फे ज्येष्ठांचा सन्मान...!






महाराष्ट्र भाडेकरू संघ आयोजीत कामाठीपुरा येथील श्री. दत्तगुरु प्रतिष्ठान सभागृहात मराठा समाजाचे नेते श्री. केशवराव (भाई) भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठांचा सन्मान सोहळा नुकताच संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र लकेश्री प्रास्ताविकपर भाषण करून उपस्थित मान्यवर ज्येष्ठ नागरिक यांच्या कार्याचा आढावा घेतला. याप्रसंगी उपस्थित मान्यवर नगरसेवक श्री. राजेंद्र नरवनकर, माजी नगरसेवक बबन गवस, शाकीर अन्सारी, निवृत्त पोलिस अधिकारी लियाकत सय्यद, शिवसेना शाखाप्रमुख सुरेश शेट्टी, माजी शाखाप्रमुख सुनिल कदम, सिने नाट्य दिग्दर्शक-पत्रकार महेश्वर तेटांबे, विलास नलावडे, मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक आणि विविध समाजातील तसेच विविध धर्मातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यांत ज्येष्ठ नागरिक बी. बी. राक्षे, बाबी तळेकर, सखाराम भाई गुजर, जुजेर पाटनवाला, डॉ. उमाकांत रागटे, डॉ. राजाराम वल्लांकटी, डॉ. रमेश इपकायल, अँड. मधुकर उगले, हभप सखाराम बुवा अहिरे, साहित्यिक-कवी शशिकांत सावंत, सूर्यकांत आंगने, पत्रकार दिलीप शेंडगे, बाळकृष्ण कासार, अशोक परब, गजानन महाडीक, दत्ताराम वंजारे, राजेश्वर जोगू, धनंजय कोरगांवकर, गंगाधर पोता, वाघरी समाजाचे केशव भाई, महिला आघाडीच्या श्रीमती मुंबादेवी कानडे व संगीता शिंदे यांच्यासह पन्नास जणांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शेवटी संस्थेचे चिटणीस दत्ताराम मुलूख यांनी उपस्थित पाहुणे आणि ज्येष्ठ नागरिकांचे आभार मानले.


धन्यवाद
महेश्वर भिकाजी तेटांबे
पत्रकार
९०८२२९३८६७

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने