आंबे ता. शिरपूर येथे श्री राम मंदिर भूमिपूजन मोठ्या जल्लोषात, उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न




शिरपूर : तालुक्यातील आंबे रविवारी येथे दि. १७ जानेवारी रोजी श्री राम मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


आंबे रविवारी येथे दि. १७ जानेवारी रोजी सकाळी श्री राम, जानकी, लक्ष्मण, हनुमान यांच्या मूर्त्यांचा कलाकर्षण विधी व श्री राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा फारच भक्तिमय वातावरणात व भाविकांच्या हर्षोल्हासात संपन्न झाला. त्यानंतर दुपारी १२ वाजेपासून महाप्रसाद (भंडारा) कार्यक्रम संपन्न झाला.


यावेळी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल म्हणाले, परमेश्वर आपल्या कडून मंदिर निर्मिती काम करवून घेतात. परमेश्वराची मनापासून आराधना, सेवा करावी. सर्वांनी ईश्वरीय कार्यात स्वतःला झोकून द्या. सेवाभावी वृत्तीचा सर्वांनी अवलंब करावा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुक्याचे आमदार काशीराम पावरा होते. शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल व सौ. कृतिबेन भूपेशभाई पटेल (श्रीराम, कृष्ण उपासक) यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाला ह. भ. प. महंत सतिषदास भोंगे, भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, सुभाष कुलकर्णी, रोहिणी गटाचे जिल्हा परिषद सदस्य कैलास पावरा, आंबे गण पंचायत समिती सदस्य दिनेश पावरा, रोहिणी गण पंचायत समिती सदस्य बागल्या पावरा, तालुक्यातील अनेक पदाधिकारी, आंबे वि. का. सोसायटी चेअरमन आर. आर. माळी, धीरज माळी, आंबे येथील ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सुभाष कुलकर्णी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करुन अनेक धार्मिक कार्यक्रमांना पाठबळ देण्याचे काम शिरपूर येथील पटेल परिवार करत असल्याचे सांगितले.


सवाद्य मिरवणूक, अनेक भजनी मंडळ यांच्या भक्तिमय व भगवामय वातावरणात तसेच श्रीरामाच्या गजरात कार्यक्रमाची सुरुवात झाली.


कार्यक्रमाच्या आयोजनासाठी स
रपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, आंबे परिसरातील ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने