शिरपूर प्रतिनिधी - हिंदु ह्रदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिरपूर शहर शिवसेना युवासेना यांच्या माध्यमातून गोरगरीब गरजुंना मायेची ऊब मिळावी म्हणून शाल वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .या कार्यक्रमास धुळे जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात तसेच धुळे जिल्ह्यात सहसंपर्क प्रमुख अतुल भाऊ सोनवणे व धुळे जिल्हा ग्रामीण जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिरपूर शहराचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक हेमंत पाटील उपस्थित होते .सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस हेमंत पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले .
तसेच यावेळी विविध क्षेत्रातील निवड झालेल्या खेळाडूंचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते धनराज राजपूत ,पंकज बारी तसेच पीएचडी व गाईडशिप मिळवणारे तलवारबाजीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रताडे सर यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत सिंह राजपूत, एसटी महामंडळ जिल्हाध्यक्ष राजू टेलर, जिल्हा संघटक विभा भाई जोगरणा, विधानसभा क्षेत्र प्रमुख छोटू सिंग राजपूत, माजी धुळे जिल्हा उपप्रमुख हिम्मतराव महाजन, तालुका प्रमुख दीपक चोरमले , अत्तरसिंग सिंग पावरा, माजी उप तालुका प्रमुख राजेश गुजर , नांना जाधव,जितेंद्र पाटील, महसूद शेख ,लक्ष्मण मराठे ,गोलू माळी ,गोलू पाटील ,आदेश ढिवरे ,शाकीर कुरेशी ,नितीन सोनार ,राहुल सोनवणे,इदिश शहा ,वाजीद मलिक, बंटी मराठे, जिगर मराठे, मयूर महाले, तुषार महाले, दिनेश गुरव, भावेश जैन ,राहुल चौधरी या कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना शहर प्रमुख मनोज धनगर शिवसेना शहर संघटक प्रमुख प्रेम कुमार चौधरी शिवसेना उपशहरप्रमुख बंटी लांडगे उपशहरप्रमुख योगेश ठाकरे ,सिद्धार्थ बैसाने युवासेना शहर अधिकारी गोलू मराठे युवा सेना शिरपूर शहर समन्वयक सचिन शिरसाठ इ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेम कुमार चौधरी यांनी केले तर प्रास्ताविक भरत सिंग राजपूत व आभार मनोज धनगर यांनी व्यक्त केले.
Tags
news
