शिर्डी - महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने आरोग्य भूषण पुरस्कार श्री जितेंद्र पाटील यांना सन्मानित करण्यात आले.
श्री. सदाशिव लोखंडे साहेब (खासदार ) शिर्डी लोकसभा मतदार संघ. मा. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर( समाज प्रबोधनकार ) मा. एकनाथ ढाकणे( राज्याध्यक्ष ग्रामसेवक युनियन) यांच्या हातून श्री जितेंद्र पाटील यांना ""आरोग्य भूषण"" पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाच्यावतीने दिला जाणारा महाराष्ट्र राज्य आरोग्य भूषण पुरस्कार जळगाव जिल्ह्याचे भूषण सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले.सध्या कल्याण मुंबई येथे आरोग्य धनसंपदा फाउंडेशन अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील शिर्डी येथे आरोग्य भूषण पुरस्कार यांना देण्यात आले . जितेंद्र पाटील मुंबईतील नामांकित हॉस्पिटल मधून गरीब व गरजू रुग्णांना ऑपरेशन साठी मोफत किंवा अल्प दरात मदत करत असतात. ग्रामीण भागातील रुग्णांना मुंबईसारख्या शहरातील अत्याधुनिक व अद्यवावत वैद्यकीय सेवा मिळवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य शस्त्रक्रिया शिबिर राबवतात. गरीब व गरजू रुग्णांना रोग मुक्त करण्याचे कार्य करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे प्रयत्न करतात. करोना महामारीत त्यांनी कल्याण सारख्या ठिकाणी गरीब गरजूना अन्नधान्य. आणि रोज 700 लोकांना जेवण देण्याचे कार्य करत होते. तसेच असैनिक अल्बम 30 रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी 20 हजार बॉटल मोफत वाटप करून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली . जितेंद्र पाटील हे अनाथ बेघर मुलांना जेवण व दैनंदिन लागणारे साहित्य ते वाटप करतात. तसेच अपंगांना जयपुर फूट. कॅलिपर. मिळवून देण्याचे कार्य करत राहतात.
जितेंद्र पाटील त्यांना आतापर्यंत शंभरहून अधिक पुरस्कार मिळाले असून त्यात तीन पुरस्कार हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित पुरस्कार समजले जातात.
Tags
news
