शिरपूर प्रतिनिधी- शिरपूर तालुक्यात 34 गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून आता प्रचाराने वेग घेतला आहे शिरपूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेली व परिसरातील जवळपास 20 ते 22 खेडे गावे यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेली ग्रामपंचायत होळ यांची 2021 चे पंचायत निवडणूक सध्या परिसरात चर्चेचा विषय आहे. 2021 च्या निवडणुकीत 11 सदस्यांसाठी 23 उमेदवार रणांगणात असून गावातील 3316 मतदार या उमेदवारांपैकी 11 सदस्यांची निवड करणार आहेत. ग्रामपंचायतीची निवडणूक अत्यंत चुरशीची मानली जात असून यात संपूर्ण विकास पॅनल चे प्रणेते जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक संजय पाटील हे असून त्यांच्याविरोधात कडवी झुंज देण्यासाठी ग्राम विकास परिवर्तन पॅनल च्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते तनवीर शिंपी रणांगणात आहेत.
शिंपी यांची निवडणूक लढवण्याची ही प्रथम वेळ असून अजंदे ग्रामपंचायत मध्ये दहा वर्ष सत्तेवर असणाऱ्या यशस्वी कामगिरी करणाऱ्या सम्राट ग्रुपचे मालक चंद्रकांत पाटील यांच्या त्यांना मार्गदर्शन व पाठिंबा आहे. दुसरीकडे संपूर्ण विकास पॅनल चे प्रणेते संजय पाटील हे राजकारणात चांगले यश मिळवले असून त्यांना एक पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा व दोन पंचवार्षिक जिल्हा परिषद निवडणूक जिंकण्याच्या पूर्व अनुभव आहे. संजय पाटील यांची परिसरातील नागरिकांची राजकीय माध्यमातून नाळ जोडली गेली असून मागील काही काळापासून तनवीर शिंपी यांनीदेखील सामाजिक कार्याच्या माध्यमातून गावातील जनतेशी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या समाज कार्याची सुरुवात केली आहे .गावातील ग्रामदैवत रामदेव बाबा यांच्या मंदिरात पूजन करून प्रचाराचा नारळ दोन्ही पक्षांकडून वाढवण्यात आला आहे. निवडणूक लागली म्हणून गावातील विविध समाजाचे नामफलक यांचे भाग्य उजळले असेल निवडणुकीच्या निमित्ताने का असेना सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांना या फलकांचे पूजन करून आपला राजकीय डाव साधण्याचे संधी प्राप्त झाली आहे .त्यामुळे 2021 ची ग्रामपंचायत निवडणूक प्रमुख प्रचाराची धुरा ही गावातील तरुणांकडे असून यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होईल असा राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे. दोन्ही पॅनलचे प्रमुख हे आमदार अमरिशभाई पटेल यांचे खंदे समर्थक आहेत
यापूर्वी ग्रामपंचायतीमध्ये स्वर्गीय शंकर नाईक, टागोर परदेशी ,राजेंद्र कुंभार ,डॉक्टर डी बी पाटील यांनी आपली राजकीय कारकीर्द गाजवली आहे .त्यासोबतच मागील पंचवार्षिक निवडणुकीत संजय पाटील यांनी डॉक्टर डी बी पाटील यांच्या पॅनल ला जोरदार लढत देऊन निवडणूक लढवली होती या निवडणुकीत संजय पाटील यांच्या निसटता पराभव झाला होता .त्यामुळे 2021च्या निवडणुकीत कोण बाजी मारतयं आणि कोणाच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडणार याकडे मतदारांचा व परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.
Tags
news
