पत्रकार दिनानिमित्त शिरपूर शहरात पत्रकारांचे स्वागत सत्कार कार्यक्रम संपन्न महाराष्ट्र पत्रकार संघ व शिरपूर शहर पोलीस स्टेशन यांचे आयोजन




 शिरपूर प्रतिनिधी-  महाराष्ट्र राज्यात दि. 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो .पत्रकारितेचे आद्य जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यात पत्रकार दिवस साजरा केला जातो .पत्रकार दिनाचे औचित्य साधून शिरपूर शहरात महाराष्ट्र पत्रकार संघ यांच्यावतीने सकाळी 11 वाजता संपादक ईश्वर बोरसे तालुका अध्यक्ष हेमंत चौधरी यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शहर व तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते .या कार्यक्रमात पत्रकारांच्या सम्मान सत्कार करण्यात आला व ज्येष्ठ पत्रकारांनी मार्गदर्शन केले .
पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष हेमंत चौधरी यांनी सर्व पत्रकार बांधवांचे एक वर्षाच्या अपघाती विमा त्यांचे स्वर्गीय वडील यांच्या स्मरणात मोफत काढून देण्याची घोषणा केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार सुभाष दादा कुलकर्णी होते तर व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार प्रतिनिधी म्हणून अरुण दलाल, रत्नदीप सिसोदिया, विजय सिंह राजपूत, राजू बापू दोरिक ,प्रताप सरदार, अरुण धोबी, इत्यादी उपस्थित होते मान्यवरांनी या वेळेस पत्रकारांना संबोधन करून मार्गदर्शन केले. यावेळेस पत्रकार प्रतिनिधी म्हणून युवराज माळी, गोपाल मारवाडी ,विश्वास माळी, विनोद सोनार ,अनिल राजपूत ,गणेश जैन, विकास चव्हाण, संजय पाटील, महेंद्र जाधव ,प्रदीप दहिवदकर, सजन पावरा ,भूषण धाकड, अंबादास सदरे ,रावसाहेब चव्हाण, लक्ष्मण गोपाळ, प्रशांत चौधरी,अमोल राजपूत, राजेश मारवाडी, ईश्वर बोरसे, हेमंत चौधरी, सुनील साळुंखे ,किशोर माळी इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.

शिरपूर शहर पोलीस स्टेशन च्या वतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने पत्रकारांच्या सन्मान




 पत्रकार दिनाचे औचित्य साधून शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तालुक्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांच्या स्नेहमेळावा शहर पोलिस ठाण्यात काल सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला होता यावेळेस पोलीस आणि पत्रकार हे दोन्ही समाजाचे पूरक घटक असून एकमेकांच्या सहकार्याने दोन्ही घटक कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी समाजाची मदत करत असतात या भावनेतून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पत्रकारांच्या स्नेहमेळावा व सन्मान कार्यक्रम आयोजित केला होता सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी अनिल माने तर प्रमुख उपस्थिती पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व पीएसआय किरण बारे उपस्थित होते या कार्यक्रमात पोलिसांच्यावतीने पत्रकारांच्या सन्मान आणि सत्कार करण्यात आला शिवाय अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी पोलीस आणि पत्रकार यांच्यातील सुवर्णमध्य साधत दोन्ही एकमेकांचे पूरक घटक असून प्रसन्न की काही वेळेस पोलिसांनी प्रकारात मतभेद जरी झाले तरी ते समाज विकासासाठी असतात तो कोणताही म्हणतायेत न करता पुन्हा एकत्र येऊन पोलिस कायद्याचे रक्षण करतात तर पत्रकार समाज आरक्षणाचे व अन्यायाविरुद्ध भाच्या कडून सामान्यांना न्याय देण्याचे काम करत असतात याची जाणीव करून देत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळेस अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. व पोलीस दलाने सामाजिक बांधिलकी नाही पत्रकारांच्या सन्मान केला म्हणून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशांत चौधरी यांनी केले या वेळी देखील पत्रकार व संपादक  उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने