शिरपूर : येथील तेली समाज पंच मंडळ तर्फे तेली समाज भुवन नुतनीकरण वास्तुचे उद्धघाटन व श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी तसेच धुळे नंदुरबार विधार परिषद निवडणूकीत आमदार म्हणून निवडून आलेले आ. अमरिशभाई पटेल यांचा भव्य सत्कार समारंभ दि. ११/०१/२०२१ सोमवार रोजी सायं ६ वाजेला आयोजित करण्यात आले आहे. तेली समाज भुवन नुतनीकरण वास्तुचे उद्दघाटन आ. अमरिशभाई पटेल (माजी शालेय शिक्षण मंत्री महा.राज्य) यांचा हस्ते तर कार्यक्रमाचे व्दिप प्रज्वलन आ. काशिराम पावरा यांचा हस्ते करण्यात येणार आहे. माल्यार्पण व प्रतिमा पुजन सौ. जयश्रीबेन अमरिशभाई पटेल (नगराध्यक्ष : शि.व.न.प.शिरपूर), भुपेशभाई पटेल (उपनगराध्यक्ष शि.व.न.पा.शिरपूर), डाॅ. तुषार रंधे (अध्यक्ष जि. प. धुळे) प्रभाकरराव चव्हाण (माजी नगराध्यक्ष शि.व.न.प.शिरपूर), सौ. छायाताई ईशी (सभापती बांधकाम समिती शि.व.न.प. शिरपूर) यांचा हस्ते करण्यात येणार आहे. तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन मोहन पाटील (गटनेते व नगरसेवक शि.व.न.प.शिरपूर), राजगोपाल भंडारी (उपाध्यक्ष शिरपूर एज्यु. सोसायटी शिरपूर), नरेंद्रसिंह सिसोदिया (सभापती कृ.उ.बा.समिती शिरपूर), प्रसन्न जैन (चेअरमन दि. मर्चंट बॅन्क शिरपूर) हे उपस्थित राहणार असुन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बबनराव चौधरी (जिल्हाध्यक्ष तैलिक समाज महासभा धुळे तथा अध्यक्ष तेली समाज पंच मंडळ शिरपूर) हे असतील. सदरील कार्यक्रम तेली समाज भुवन, चौधरी गल्ली शिरपूर जि.धुळे या ठिकाणी होणार आहे. कार्यक्रमाला समाज बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहान शिरपूर तेली समाज पंच मंडळचे उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, खजिनदार संतोष चौधरी, सचिव जगदिश चौधरी, सहसचिव रमेश चौधरी, कार्यकारी सदस्य सुरेश चौधरी, शामकांत ईशी, संजय चौधरी, ईश्वर चौधरी, चंद्रवदन चौधरी, मोहन चौधरी, दुर्गेश चौधरी, नरेश चौधरी, युवराज चौधरी, महेश चौधरी, विजय चौधरी, जितेंद्र सोनवणे, योगेश चौधरी, उत्तम चौधरी, विजय चौधरी, सुरेंद्र चौधरी यांनी केले आहे.
Tags
news

Very good information on the page. आपकी पोस्ट बहुत ही अच्छी लगी लेखक को बहुत-बहुत धन्यवादQupt blog
उत्तर द्याहटवा