शिरपूर प्रतिनिधी -
शिरपूर तालुक्यातील गांजा शेतीवर धडक कार्यवाही करण्याचे निर्देश मा. पोलीस अधीक्षक धुळे यांनी दिले आहेत त्यामुळे शिरपूर तालुका पोलिस स्टेशनचे पथक गांझा शेतीच्या शोध घेण्याच्या कामावर असताना तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना गोपनीय बातमीदार याद्वारे माहिती प्राप्त झाली होती .त्यानुसार पथक तयार करून व आवश्यक त्या विभागांना सुचीत करून माहिती मिळाल्याच्या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली असता चार लाखांपेक्षा अधिक किमतीच्या अमली अदृश्य पदार्थ, हिरवी झाडे पाने व मुळे या सह असा मानवी मनावर परिणाम करणारा व महाराष्ट्र राज्यात विकीवर बंदी असलेला अमली पदार्थ आढळून आल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 27 जानेवारी रोजी पोलिस कॉन्स्टेबल हेमंत मनोहर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 5 / 2021 एनडीपीएस कायदा कलम 20- -22 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. यात पोलीस पथक गांझा शेतीच्या शोध घेत असताना महादेव दोडवाडा शिवारातील सोज्या पाडा तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथील गेंदाराम झिपा पावरा हा कसत असलेल्या वनशेतीत गांजा सदृश पदार्थ आढळून आलेत त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत सदर मुद्देमाल ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. यात 4 लाख 11 हजार 400 रुपये किमतीचे अमली सदृश्य पदार्थ जप्त करण्यात आले आहे. आरोपी फरार झाला असून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित सो, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव सो, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने सो,यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस कॉन्स्टेबल गवळी, मोरे, पोलीस नाईक पवार ,योगेश दाभाडे कॉन्स्टेबल पठाण, शिंदे, पावरा, चालक गोविंद कोळी इत्यादींच्या पथकाने पंचांसमक्ष वन अधिकारी यांना सोबत घेऊन केली आहे.
Tags
news
