मनमाड येथे प्रजासत्ताक दिवशी मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती तर्फे महान स्वतंत्रसैनिकांचे माहिती प्रदर्शन उत्साहात संपन्न .



नाशिक शांताराम दुनबळे 
  नाशिक    -: २६जानेवारी प्रजासत्ताक्र दिन निमित्त  मुस्लिम आरक्षण  संघर्ष समितीच्या वतीने स्वातंत्र्य सैनिक  माहिती प्रदर्शन  क्रार्यक्रम  उदघाटन मनमाड पोलीस निरीक्षक गीते साहेब यांच्या हस्ते  करण्यात आले,

भारत स्वतंत्र चळवळीतील स्वातंत्र सेनानी ज्यांनी स्वतंत्र चळवळी मध्ये आपले सर्वस्व अर्पण करून देशासाठी स्वता चे बलिदान दिले परंतु इतिहासाच्या पानात त्यांचा उल्लेख नाही, त्यांनी देशासाठी केलेले महानकार्य व स्वतःचे जीवन बलिदान हे नागरिकांना माहीत नाही,  त्यांचे नावची  देखील नागरिकांना माहीती नाही, म्हणून मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती मनमाड तर्फे माहिती प्रदर्शन घेण्यात आले ह्या ,प्रदर्शनात स्वातंत्र चळवळीत गांधीजींच्या आव्हाणाला हाक देता,सैय्यद शाह कादरी बियाबानी यांनी स्वतंत्र चळवळी साठी स्वताची ५००एकर जमीन दान दिली, तर 
नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आझाद हिंद सेना निर्माण करण्यासाठी त्या काळी मेमन अब्दुल हबीब युसुफ मारफानी यांनी एक कोटी रुपये दान दिले,,तसेच 

देशासाठी हसत फासावर लटकुन गेले ते शहीद मौलाना पीर अली खान व त्यांचे 13 साथीदार,फाशी देण्यात आली, तसेच शहीद अश्फाक उल्ला खान,व मौला अली मुस्लीयार यांना देखील फाशीची शिक्षा झाली 

स्वतंत्र चळवळ आंदोलनामध्ये जेलमध्ये शिक्षा व्यातीत करणारे,
रफी अहमद कीदवई 10 वर्ष जेल,,,डॉ मगफूर अहेमद एजाजी 13 वर्ष जेल,,,मौलाना अताउल्लाह शाह बुखारी 10 जेल,,,,मौलाना मोहम्मद अली जोहर 4 वर्ष जेल,
मौलाना मंजूर अहसान एजाजी 13 वर्ष जेल,,,असे  असंख्य स्वातंत्र सेनानी आहे ज्यांनी आपले आयुष्य देशा साठी जेलमध्ये व्यातीत केले परंतु ही माहिती इतिहासात पाहायला मिळत नाही म्हणून हे स्वतंत्र सेनानी गुमनाम झाले, 
 माहिती प्रदर्शन कार्यक्रम घेऊन मुस्लिम आरक्षण समिती तर्फे नागरिकांना ही सर्व माहिती देण्यात आली,ह्या वेळी शहरातले विविध धर्माचे धार्मिक गुरू,विविध पक्ष पदधिकारी,विविध सामाजिक संघटना,शिक्षक,व्यापारी,कामगार वर्ग,रेल्वे युनियन नेते,महामंडळ युनियन,सोबत असंख्य नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित दिली,

या वेळी विविध पक्ष,संघटना प्रमुख यांची  कार्यक्रम बद्दल मनोगत व्यक्त केले 

मास  समितीचे युवा कार्यकर्ते सद्दाम अत्तार,शकील शेख यांचा कार्यक्रमा मध्ये वाढदिवस निमित्त पुष्प देऊन सत्कार देखील करण्यात आला,

रेल्वे एस सी एस टी एम्प्लॉईज तर्फे 
समितीचे पदधिकारी कयाम सैय्यद,
कादिर शेख,फिरोज शेख,मौलाना तौसिफ,फरिदा मिठाईवाला, मुमताज आपा बेग,अफरोज अत्तार,सद्दाम अत्तार,जाहिद शेख,भीमराज लोखंडे रिजवान कुरेशी,रियाज शेख यांचे सत्कार करण्यात आला

कार्यक्रमाचे प्रमुख पाऊणे म्हणून  आय ऐ एस पोस्ट अधिकारी,मोहम्मद फ़ैज  सी ङब्लु एम एम एम आर यांनी हजेरी दिली या वेळी समितीचे कयाम सैय्यद,कादिर शेख,आफरोज अत्तार,सद्दाम अत्तार, यांनी सरांचे पुष्प देऊन स्वागत केले, 
मोहम्मद फ़ैज यांनी स्वतंत्र सेनानीं विषयी संपूर्ण माहिती घेतली,व कार्यक्रम बद्दल आपले मत व्यक्त केले, ह्या वेळी समितीचे सर्व पदाधिकारी सोबत शकील शेख,मोहसीन अत्तार,जावेद शेख,अहमद शेख, असंख्य पदाधिकारी नागरिक व कार्यकर्ते  कार्यकर्ते उपस्थित होते,

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने