गावाच्या विकासासाठी सर्व पदाधिकारी यांनी एकजूट राखून प्रयत्नशील राहावे - भूपेशभाई पटेल यांचे आवाहन, अर्थे खु. ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन संपन्न




शिरपूर : गावाच्या विकासासाठी सर्व पदाधिकारी यांनी एकजूट राखून प्रयत्नशील राहावे असे भूपेशभाई पटेल यांनी आवाहन अर्थे खु. ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी केले.

अर्थे खु. ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन मंगळवारी दि. २६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता तालुक्याचे आमदार काशीराम पावरा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार काशिराम पावरा म्हणाले, गावाचा सरपंच विकासाभिमुख असावा. अर्थे खुर्द गावाने सरपंच दिपाली गुजर यांच्या कार्यकाळात अनिल पाटील व मुंबईचे सुनील पाटील यांच्या प्रयत्नांनी केलेला विकास अभिमानाची बाब आहे. गटतट विसरून इतर सरपंच यांनी आदर्श घेतला तर तालुक्याचा विकास होईल.

याप्रसंगी धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे म्हणाले, गावात सुरू असलेल्या विकासकामांचे विशेष कौतुक केले पाहिजे. वीज खांब व वीज वाहिन्या नूतनीकरण होत आहे ही गावासाठी महत्त्वाची बाब आहे. संबंधित अभियंता हेमंत सैंदाणे सारखे नियोजन इतरांनीही करावे.

शिरपूर तालुक्याचे नेते उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल म्हणाले, सौ. दिपाली गुजर या महिला सरपंच असल्याने त्यांनी महिलांच्या आरोग्यासाठी देखील प्रयत्न करावे. शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलला महिलांच्या रक्ताच्या समस्या आणि त्यांच्या हिमोग्लोबीनचे प्रमाण पाहिले असता महिलांसाठी विशेष आरोग्याच्या सोयी सुविधा करणे गरजेचे आहे. गावागावात बाल संस्कार केंद्र सुरू करण्यात यावे. स्व. तपनभाई पटेल यांच्या स्मरणार्थ सरपंच दिपाली अनिल गुजर यांनी स्वतः अर्थे खुर्द गावात दिलेल्या पीठगिरण्या व येथे गरीब कामगार कष्टकरी यांनी दळण दळण्यासाठी त्यांना सवलत देणे हा आदर्श इतर गावांनीही घेण्याची गरज आहे. अर्थे खुर्द ची विकासकामे इतर गावासांठी प्रेरणादायी असून याप्रमाणे काम सर्वांनी करावे. शिरपूर तालुक्यामध्ये ग्रामपंचायती देखील विकासाच्या वाटेवर जात असल्याचा अभिमान यावेळी भूपेशभाई पटेल यांनी व्यक्त केला.

आशिष अरुणभाई गुजराती म्हणाले, अर्थे गावातील विकास कामांच्या बाबतीत अनिल गुजर नेहमीच संपर्कात असतात. मुंबईला सुनील पाटील यांचे प्रयत्न सुरूच असतात. गावासाठी काम करणारे या बंधूंचे ग्रामपंचायतीच्या विकासात योगदान आहे.
यावेळी विविध विकास कामांसह दिव्यांग युवक व नागरिकांना सानुग्रह अनुदानाचे धनादेश वाटप करण्यात आले.

यावेळी भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, चोपडा येथील प्रसिद्ध उद्योगपती चंद्रहासभाई गुजराथी, विद्याविहार हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन अशोक कलाल, भाजपा माजी तालुकाध्यक्ष राहुल रंधे, चोपडा पंचायत समितीचे माजी उपसभापती एम. व्ही. पाटील, मंत्रालयातील सुनिल पाटील, विद्युत वितरण कंपनीचे अभियंता हेमंत सैंदाणे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्रसिंह सिसोदिया, शिरपूर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव पाटील, व्हाईस चेअरमन दिलीपभाई पटेल, पंचायत समिती माजी उपसभापती संजय पाटील, माजी जि. प. सदस्य वसंतराव पाटील विखरण, उपसरपंच उषाबाई बडगुजर,
महाराष्ट्र राज्य कृषिरत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी ऍड. प्रकाश भूता गुजर, सूतगिरणीचे संचालक नामदेव महाराज चौधरी वाडी,  पंचायत समितीचे माजी सदस्य छगन गुजर, जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती बी. एच. पवार, सरपंच प्रशांत पाटील भोरटेक, सरपंच सुरेश पाटील भोरटेक,  तोंदे माजी सरपंच लोटन पाटील, जातोडा डी. जे. राजपूत, विखरण माजी सरपंच शाम पाटील, जापोरा सरपंच दिगंबर पाटील, वाडी विकासो चेअरमन दरबारसिंग राजपूत, कारखाना संचालक प्रकाश चौधरी,  पंचायत समितीचे माजी उपसभापती सुभाष गुजर, सूतगिरणीचे संचालक व माजी सरपंच अर्थे जानकीराम पाटील, संजय चौधरी, भालेराव माळी, राजेश भंडारी, पंचायत समितीचे माजी सदस्य चेतन पाटील, मार्केट कमिटीचे संचालक रजेंद्र पाटील, अर्थे बु. सरपंच साहेबराव पाटील, ताजपूरी सरपंच हेमंत पाटील, अजंदे खु. सरपंच राजेंद्र पाटील यासह पंचक्रोशीतून मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक संतोष पाटील यांनी केले. आभार सुनील पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविनाश पाटील, किरण कोळी, तपनभाई पटेल युवामंचचे सर्व तरुण कार्यकर्ते आणि अनिल भाऊ युवा मंचचे कार्यकर्ते, नंदू गवळे, काशिनाथ कोळी, रघुनाथ गुजर, ग्रामसेवक राजेंद्र माळी, ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने