शेतकरी आत्महत्या निर्मूलन व सहाय्यता समितीच्या बैठकीत आठ प्रस्ताव पात्र

 



 

धुळे, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) : शेतकरी आत्महत्या निर्मूलन सहाय्यता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत एकूण आठ प्रस्ताव पात्र ठरले, तर पाच प्रस्तावाची फेरचौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जिल्हाधिकारी संजय यादव अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रामकृष्ण खलाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मनोजकुमार दास, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता प्रकाश पवनीकर, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), डॉ. विक्रम बांदल (शिरपूर), जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, तहसीलदार गायत्री सैंदाणे (धुळे ग्रामीण), सुनील सैंदाणे (शिंदखेडा), आबा महाजन (शिरपूर), अपर तहसीलदार प्रवीण थवील (पिंपळनेर) आदी उपस्थित होते. संबंधित तहसीलदारांनी चौकशी करुन सदरचे प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केले होते.

या बैठकीत एकूण 25 प्रस्ताव मांडण्यात आले होते. त्यापैकी आठ प्रस्ताव मंजूर झाले. 12 प्रस्ताव अपात्र ठरले. पाच प्रस्ताव फेरचौकशीसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. मंजूर प्रस्ताव असे : धुळे ग्रामीण- 3, साक्री- 2, शिरपूर- 3.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने