■■ शहादा तालुका ग्रामिण भागातील पहिल्या ओपन "मी सिलेक्ट होणारच २०२१-२२ स्पर्धा परिक्षा" आयोजन
◆◆ शहादा तालुक्यातून ७० उमेदवारांचा सहभाग
शहादा (प्रतिनिधी) :- वडाळी येथिल ग्रामिण बहुउद्देशिय विद्याप्रसारक मंडळ आयोजित मी सिलेक्ट होणारच स्पर्धा परिक्षा २०२१-२२ चे यशस्वी आयोजन दि. ०७ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र मैदानावर (नवनाथ मंदीर) करण्यात आले शहादा तालुक्यातून पोलिस ,आर्मी समकक्ष ७० उमेदवारांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला कोविड १९ प्रभावाचा अंदाज पाहता प्रत्येक परिक्षार्थी मध्ये ५ फुट बाय ५ फुट अंतर राहिल अशी बैठक व्यवस्था करण्यात आली मास्क, सँनिटायझर व १० प्रशिक्षित पर्यवेक्षक व मंडळाचे संचालक यांच्या साहाय्याने सुसजज व परिक्षा आयोजन व बक्षिस वितरण अशा दोन टप्प्यात हा भव्य कार्यक्रम राबविण्यात आला उमेदवारांना स्फुर्ती मिळावी व स्पर्धा परिक्षा तयारी साठी एक मार्ग मिळावा तसेच
स्व - मुल्यमापन करण्याची एक अनमोल संधी मिळावी या हेतूने तालुक्यातील स्पर्धकांना ग्रामिण बहुउद्देशिय विद्याप्रसारक मंडळाने एक व्यासपिठ उपलब्ध करून दिले उमेदवारांनी प्रत्यक्ष सहभागी होऊन आपले मुल्यमापन केले
तत्पुर्वी प्रथम सत्रात कार्यक्रमाचे उद्घाटन जि.प.सदस्य प्रतिनिधी के.डी.नाईक, पं.स.सदस्य प्रतिनिधी देवेंद्र पानपाटील,माजी सरपंच दिपकभाई पाटील,माजी उपसरपंच अभय गोसावी,पोलिस पाटील गजेंद्रगीर गोसावी, सामाजिक कार्यकर्ते रवीभाऊ नाईक, संजयदादा पानपाटील यांनी बहुजन अराध्य शाहू महाराज , महात्मा फुले डाँ बाबासाहेब आंबेडकर, शहिद भगतसिंग प्रतिमा पुजन तथा श्रीफळ वाढवून केले संस्थेतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला "जिद्द असली की स्वत: ला सिद्ध करता येते मग क्षेत्र कोणतेही असो" असे प्रतिपादन जि.प.सदस्य प्रतिनिधी के.डी.नाईक यांनी केले
द्वितीय सत्रात सारंगखेडा पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक राजेश शिरसाठ, शहादा तालुका ग्रामिण पत्रकार संघ अध्यक्ष संजय मिस्त्री, महाजन कंम्प्युटर्स संचालक सुरेश महाजन, नवनाथ सेवाभावी संस्थेचे सचिव महेंद्र जगताप, उद्यमशिल सेवाभावी संस्थेचे सुशिल गव्हाणे, आदी उपस्थित होते पोलिस निरिक्षक राजेश शिरसाठ यांनी त्यांचा शाळेतील शिक्षण ते पोलिस निरिक्षक पदावर सिलेक्ट होई पर्यंतचा प्रवास कथन करून उमेदवारांना प्रेरणा दिली तसेच श.ता.ग्रा.पत्रकार संघ अध्यक्ष संजय मिस्त्री, सुरेश महाजन यांनी स्पर्धा परिक्षा संदर्भात अनमोल मार्गदर्शन केले तसेच विजेत्या स्पर्धकांना परितोषिक वितरण करण्यात आले स्म्रुती चिन्ह व रोख रक्कम प्रदान करण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रामिण बहुउददेशिय विद्याप्रसारक मंडळ अध्यक्ष नरेंद्र सोनवणे ,उपाध्यक्ष दिनेश पवार,सचिव चंद्रकांत रायसिंग, संचालक हरिष सोनवणे, छत्रपती शिवाजी महाराज भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र संचालक भुषण बेलदार,मनोज माळी नवनाथ सेवाभावी ट्रस्टचे सचिव महेंद्र जगताप यांनी प्रयत्न केले परिक्षक म्हणून अनिल जगताप,गोरख वाल्हे,कैलास सैंदाणे,भुषण बेलदार,मनोज माळी यांनी कामकाज पाहिले
◆◆ प्रतिक्रिया :-
"जिद्द असली की स्वत: ला सिद्ध करता येते मग क्षेत्र कोणतेही असो" ग्रामिण भागातील पहिली ओपन स्पर्धा परिक्षा आयोजित करून ग्रामिण बहुउद्देशिय विद्याप्रसारक मंडळाने अनमोल कार्य केले आहे उमेदवारांना व्यासपिठ उपलब्ध करून देऊन मुल्यमापनाची संधी दिली त्या बद्दल त्यांचे अभिनंदन जिल्हा परिषद निधितून या मैदानावर हायमस्ट लँम्पची सोय लवकरच उपलब्ध करून देणयात येईल
*के.डी.नाईक (जि.प.सदस्य प्रतिनिधी)*
◆◆ उंच गगनभरारी घेण्याचे स्वप्न पहा जो आपल्या क्षमतेच्या पलिकडे जाऊन मेहनत घेतो तो कधिच अपयशी ठरत नाही मी सिलेक्ट होणारच हा उपक्रम मंडळाने निरंतर राबवावा
*राजेश शिरसाठ(पो.नि. सारंगखेडा)*
Tags
news
