वाहनावर राजकीय पक्षाचे चिन्ह वापरल्यास कारवाई




■■वाहनावर राजकीय पक्षाचे चिन्ह वापरल्यास कारवाई

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि. 8 : जिल्ह्यात 87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम सुरू असल्याने आचारसंहिता कालावधीत वाहनावर राजकीय पक्षाचे चिन्ह, झेंडा, शासकीय लोगो इत्यादिंचा वापर करून फिरणाऱ्या वाहनावर आणि संबंधित वाहन धारकांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश उपजिल्हाधिकारी बालाजी  क्षीरसागर यांनी उपप्रादेशिक परिवहन  अधिकारी  कार्यालयाला दिले आहेत. आचारसंहिता कालावधीत वाहन धारकांनी आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहनदेखील करण्यात आले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने