मुकटी येथे जि.प.केंद्रशाळेत प्रजासत्ताक दिन साजरा



मुकटी - २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन निमित्त जि, प,केंद्रशाळेत संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.व गावाचे मा,सरपंच सुदाम पाटील यांच्या हस्ते ध्वजस्तंभ पूजन व ध्वजारोहण करण्यात आले,यावेळी सरपंच सौ, ललिता चतुर पाटील,जि.प.सदस्या सौ.मंगलाताई पाटील प.स.सदस्य पंढरीनाथ पाटील.मा.प.स.सदस्य छोटूभाऊ चौधरी, वि.का.सोसायटीचे चेअरमन डॉ,राहुल कुवर कृ.उ.बा.समितीचे उपसभापती रितेश पाटील मुकटी केंद्राचे केंद्रप्रमुख चंद्रकांत शिंदे,शा.व्य.समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर सुतार, शा.व्य. स.शिक्षणतज्ञ योगीराज सैंदाणे मा.सरपंच उमाकांत पाटील शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती विजया सैंदाणे.तसेच ग्रा.प.सदस्य ग्रामस्थ जेष्ठ नागरिक उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती. स्मिता पाटील यांनी केले.या कार्यक्रमाला श्रीमती,संध्या नगराळे सौ,उज्वला भंडारी श्रीमती, कल्पना पाटील यांचे सहकार्य लाभले,तसेच अशोक साळवे,व श्रीमती. सीमा साळवे यांनी चहापान व्यवस्था करून विशेष सहकार्य केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने